‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत झाली जादूची एंट्री; जादू बद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ?

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत झाली जादूची एंट्री; जादू बद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का ?

कलर्स मराठीवर सुरू असलेली राजा राणीची ग जोडी ही मालिका संजीवनी आणि रंजीत यांच्या प्रेम कहानी वर बसलेली आहे. मात्र, असे असले तरी या मालिकेमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना देखील महत्त्व आहे. ही मालिका गेल्या काही वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

या मालिकेमध्ये अनेक घटना घडामोडी घडताना दिसत आहेत. इतर मालिका ज्याप्रमाणे कंटाळवाण्या झाल्या आहेत, त्याप्रमाणे ही मालिका ही कंटाळवाणी झाली नाही, असे म्हणावे लागेल. कारण की या मालिकेमध्ये सगळ्याच भूमिका अतिशय जबरदस्त रित्या होतांना दिसत आहेत. या मालिकेमध्ये संजीवनी आणि रणजित यांच्या भूमिका या प्रचंड गाजताना दिसत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून एखाद्या मालिकेमध्ये एखादा कलाकार हा मालिका सोडून गेला की त्याच्या जागी दुसरा कलाकार हा येत असतो. काही दिवसापूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिका सोडल्याचे आपण ऐकले असेल. मालिका सोडण्याचे कारण हे फार वेगवेगळे असतात.

काही जणांना मालिका कंटाळवाणी वाटते तर काही जणांचा मानधनाचा विषय असतो. त्यामुळे हे कलाकार मालिका सोडतांना दिसतात. राजा राणीची गं जोडी या मालिकेमध्ये एका नवीन भूमिकेची एन्ट्री झाली आहे. ही भूमिका म्हणजे एका मुलाची आहे. त्याचे नाव जादू असे आहे. आता तो मालिकेत संजीवनी आणि रंजीत यांच्या जीवनामध्ये काय प्रभाव पडतो, हे आपल्याला लवकरच कळणार आहे.

तसेच तो नेमका या मालिकेत कशासाठी आला याबाबत देखील प्रेक्षकांना माहिती मिळणार आहे. राजा राणीची गं जोडी या मालिकेत सध्या नवीन ट्विस्ट येत आहेत. अशातच संजीवनी आणि रंजीतच्या आयुष्यात जादूची एन्ट्री झाली आहे. नव्याने एन्ट्री झालेला हा जादू कोण आहे, याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

जादूची भूमिका आयुष्य सुदर्शन उलगडे हा बालकलाकार साकारत आहे. मालिकेतील जादू म्हणजे आयुष्य हा मूळचा कोल्हापूरचा रहिवासी आहे. आयुष्य हा झी मराठीवरील संत गजानन शेगावीचे आणि स्टार प्रवाह वरील दख्खनचा राजा जोतिबा अशा मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने काही शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

सध्या राजा राणीची गं जोडी मालिकेतील त्याची भूमिका लोकांना आवडत असून त्याच्या भूमिकेचे कौतुक होत आहे, तर तुम्हाला राजा राणीची गं जोडी ही मालिका आवडते का? हे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral