अखेर अश्या प्रकारे होणार ‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेचा होणार शेवट…

छोट्या पडल्यावर सध्या राजा राणीची ग जोडी ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील सगळ्यात भूमिका या प्रेक्षकांना खूप आवडतात. मात्र, यातील संजू आणि रणजीत यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली. रणजीतची भूमिका या मालिकेमध्ये मनी राज पवार याने केली आहे.
संजूच्या भूमिकेत शिवानी सोनार ही अभिनेत्री दिसली आहे. शिवानी सोनार हिने चांगल्या प्रकारे काम केले आहे, तर आता या मालिकेचा शेवट कसा होणार याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.
राजा राणीची ग जोडी या मालिकेमध्ये आपण आजवर असे पाहिले आहे की, रंजीत आणि संजू यांचे लग्न कशाप्रकारे होते. रंजीत याचे लग्न संजूच्या बहिणी सोबत ठरलेले असते. मात्र ती पळून गेल्यामुळे त्यानंतर रणजीतला संजू सोबत लग्न करावे लागते. त्यानंतर या दोघांचा संसार सुरू होतो. त्यानंतर संजू ही ढाले पाटलांची सून म्हणून घरात वावरते आणि त्यानंतर ती पोलीस दलामध्ये सहभागी होते.
मात्र वय लपवल्यानंतर रणजीत याला कोठडी देखील होते. मात्र, संजू ही नंतर गेलेली वर्दी देखील परत मिळवते आणि रणजीत याला देखील पोलिसात पुन्हा भरती करून घेते. सध्या अपर्णाची मोठी बहीण दमयंती ही ढाले पाटलाची मोठी सून म्हणून घरात मोठ्या थाटात वावरत आहे. अनेक कटकारस्थान केल्यानंतर राया याचा बिमोड करण्यात रंजीतला मोठे यश आल्याचे आपण आजवर पाहिले आहे.
रंजीतने त्याला जेलमध्ये देखील पाठवले होते. मात्र राया हा आता मालिकेमध्ये मोकाट फिरत आहे. त्यामुळे तो कोणाला त्रास देणार हे पाहणे देखील फार मजेशीर ठरणार आहे. त्यामुळे राजा राणीची ग जोडी या मालिकेचा शेवट आता वेगळ्या प्रकारे होणार आहे. राया हा पुन्हा एकदा रणजीतला जेलमध्ये पाठवणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.
तर मालिकेच्या शेवटी आता रणजीत याला त्याचे सासरे पंजाबराव हे त्याला मदत करताना दिसणार आहेत. त्यासोबतच दादासाहेब आणि दमयंती यांची रवानगी देखील तुरुंगात झाल्याचे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. यामुळे आईसाहेब आणि रजनी साहेब या सगळ्यांनाच आता न्याय मिळताना या मालिकेत आपल्याला दिसणार आहे.
जादू याला त्याचे आई वडील आता आधीच मिळालेले आहेत. त्यामुळे तो आता त्यांच्यासोबत सुखाने राहताना दिसणार आहे. त्यानंतर रणजीत आणि संजू हे मोठे पोलीस ऑफिसर झाल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे या मालिकेचा शेवट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
तर राजा राणीची ग जोडी ही मालिका आपण पहात होते का? या मालिकेतील सगळ्यात जास्त भूमिका आपल्याला कुठली आवडली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.