‘राजा राणी ची गं जोडी’ मालिका धक्कादायक वळणावर, जादू निघणार ढाले पाटलांचा वारसदार

‘राजा राणी ची गं जोडी’ मालिका धक्कादायक वळणावर, जादू निघणार ढाले पाटलांचा वारसदार

गेल्या काही भागापासून आपण पहात आहोत की राजा राणीची ग जोडी या मालिकेत एक नवीन छोटा मुलगा दाखवण्यात येत आहे. याबद्दलचे रहस्य अजूनही ही ढाले पाटील कुटुंबीयांसमोर आलेले नाही. हा नेमका कोणाचा मुलगा असतो हे सत्य शोधण्यासाठी दादासाहेब आपल्या परीने प्रयत्न करत आहेत.

तर दुसरीकडे जादू सोबत संजीवनी व रंजीत एकत्र होताना दिसत आहे. जादूवर संजिवनी आईप्रमाणे माया करत आहे. संजीवनी कधी आई होऊ शकत नाही हे सत्य अजून ढाले पाटील कुटुंबीयांसमोर आले नाही. कुसुमावती देवी म्हणजेच आईसाहेब सातत्याने संजीवनीच्या मागे एकच गोष्ट लावून धरत असतात, ते म्हणजे आम्हाला नातवंड हवे आहे.

संजीवनी मनात आई साहेब तुम्हाला मी कसे सांगू की मी तुम्हाला नातवंड देऊ शकत नाही, असा विचार करते आणि उदास होते, तर दुसरीकडे जादू तिला या उदासपणातून बाहेर काढतो. हळूहळू जादूलाही ढाले पाटील कुटुंबीय आवडायला लागले आहे. आई साहेबांना ही जादू हा आता आवडत असतो.

जादूच्या हट्टा यमुळे आईसाहेब कामानिमित्य बाहेर दौर्‍यावर जात असताना जादूला देखील घेऊन जातात. तिथे जादू खूप छान वागला असे आईसाहेब घरी आल्यावर रंजीत व संजीवनी ला आनंदाने सांगतात. जादू नेमका कोणाचा मुलगा आहे, हे सत्य शोधून काढण्यासाठी दादासाहेब गुलाब यला या कामासाठी लावतात.

तर दुसरीकडे संजीवनी आणि रंजीत जादूला दत्तक घेण्याचे ठरवतात. त्याआधी जादू कोणाचा मुलगा आहे हे शोधणे रंजीतच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यामुळे संजीवनी अनाथाश्रमात जाऊन तेथील व्यक्तीला विचारणा करते. त्यावर तिला गोगटेकडून सविस्तर माहिती मिळेल, असे कळते.

गुलाब गोगटेकडे जाऊन जादूची खरी आई कोण आहे, याचा शोध लागते. तिकडे तिला जादूच्या आईचा फोटो मिळतो. परंतु गुलाब दादासाहेबांना हा फोटो दाखवत नाही. दादा साहेबांसोबत ती डबल गेम खेळत असते. गुलाबला त्या फोटोतील चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत असतो.

जादू ढाले पाटलांचा खरा वारसदार असतो. जादू हा नेमका कोणाचा मुलगा आहे, हे येणाऱ्या काही भागांमध्ये पाहणे आता आपल्याला औत्सुक्याचे ठरणार आहे.

Team Hou De Viral