‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील अभिनेत्रीची सुपारी फुटली, लवकरच करणार लग्न

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील अभिनेत्रीची सुपारी फुटली, लवकरच करणार लग्न

‘राजा राणी ची ग जोडी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. मालिकेत नुकत्याच झालेल्या भागामध्ये विचित्र घटना घडताना दिसत आहेत. ती घटना म्हणजे संजीवनी ही आता कधीही आई होणार नाही.

हे रणजीत याला कळाले आहे. त्यामुळे या मालिकेमध्ये आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये वेगळे टिव्स्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या मालिकेमध्ये रंजीत आणि संजिवनी ही जोडी अतिशय चांगला अभिनय करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भागामध्ये आपण असे पाहिले की संजीवनी तिच्या पोटाला गोळी लागते.

त्यानंतर ती जखमी होते आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे पूर्ण कुटुंब चिंतेत असते. तिची गोळी ही पूर्णपणे डॉक्टर बाहेर काढतात. त्यानंतर तिच्या गर्भाशयाला मोठी इजा होते. त्यानंतर रंजीत हे डॉक्टरांना भेटायला जातो. त्यावेळी डॉक्टर रणजीत त्याला सांगतात की, संजीवनी ठाले पाटील यापुढे कधीही आई होऊ शकणार नाही.

याचे कारण म्हणजे त्याच्या गर्भाशयाला खूप मोठा धोका झालेला आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर संजीवनी ही बेडरूममध्ये जाते, तर तिथे रंजीत याला सगळं काही आठवत असते. आईसाहेब संजिवनी बाळ पाहिजे म्हून काय बोलल्या हे आठवते. त्यामुळे रणजीत आता याच विचारात आहे की, संजीवनी ही आई कशी होणार. त्यामुळे तो चिंतातुर झाला आहे.

त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ते स्पष्ट लक्षात येत आहे. ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यावर सुरू आहे. त्यामुळे या मालिकेचा आता शेवट करावा, असे देखील काही प्रेक्षकांना वाटत आहे. मात्र, मालिकेचे कथानक हे पुढे पुढे जाताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेत इंटरेस्टिंग गोष्टी देखील घडताना दिसत आहेत.

मात्र अनेकांना ते आवडत नाही तर अनेक प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडते. या मालिकेत इतर काम करणारे कलावंत देखील खूप जबरदस्त अभिनय करताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये अपर्णाची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडते. अपर्णाची भूमिकाही अंकिता निक्रड तिने केलेली आहे. अंकिता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडिया वर ती आपले फोटो आणि तिच्या येणाऱ्या मालिकांबद्दल माहिती देत असते. अंकिता हिने नुकतीच एक गुड न्यूज दिली आहे. अंकिता निक्रड ही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते. अंकिता आणि तिचा प्रियकर ज्ञानेश भुकेले या दोघांचे नुकतेच केळवण पार पडले आहे.

याबाबतचे फोटो किंवा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे या दोघांचे लवकरच लग्न होणार आहे हे स्पष्ट झाले आहे. फक्त लग्न कधी होते, याची तारीख अजून यायची बाकी आहे. अंकिता सध्या सन मराठी वरील सुंदरा या मालिकेत आपल्या दिसत आहे.

Seema