फँड्री मधल्या ‘शालू’ ला लागली लॉटरी, आता दिसणार या बॉलिवूड चित्रपटात

फँड्री मधल्या ‘शालू’ ला लागली लॉटरी, आता दिसणार या बॉलिवूड चित्रपटात

काही वर्षांपूर्वी नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री हा चित्रपट आला होता. या चित्रपटाची चर्चा बरीच झाली होती. या चित्रपटामध्ये अभिनेता सोमनाथ अवघडे हा दिसला होता. सोमनाथ अवघडे अतिशय ग्रामीण बाज असलेला कलाकार आहे. मुळातच त्याला अभिनयाचा कुठलाही गंध नव्हता.

तरी देखील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्याला अभिनेता म्हणून उभे केले आणि त्याने देखील प्रेक्षकांना नाराज नाही केले. अतिशय ग्रामीण बाज असलेल्या कलावंत या चित्रपटात उभा केला होता, तर या चित्रपटामध्ये एक मुलगी दाखवण्यात आली होती. तिचं नाव शालू असे होते. गावातील पाटलाची ती मुलगी असते.

ही भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने केली होती. राजेश्वरी खरात आता चांगलीच मोठी झाली असून ती अतिशय जबरदस्त अशी दिसते. आपले फोटो सोशल मीडियावर ती नेहमी अपलोड करत असते. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर ती आपल्या फोटोच्या माध्यमातून सातत्याने संपर्कात असते.

तसेच ती आपले विचार देखील या माध्यमातून मांडत असते. राजेश्वरी खरात फॅन्ड्री चित्रपटांमध्ये अतिशय लहान होती. साधारणत 2013 14 च्या आसपास हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर नागराज मंजुळे यांची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर नागराज मंजुळे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर त्यांचा सैराट चित्रपट आला.

सैराट चित्रपटाला देखील अफाट यश मिळाले. या चित्रपटामध्ये त्याने नवीन कलावंत निवडले. आपल्या सोलापूर जिल्ह्यातील त्यांनी कलावंत निवडले होते. यामध्ये रिंकू राजगुरु हिने आर्ची ची भूमिका साकारली होती, तर परशाची भूमिका आकाश ठोसर याने साकारली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

फॅन्ड्री चित्रपटांमध्ये शालू हिने न बोलता देखील अभिनय केला होता. तिचा एकही संवाद या चित्रपटात नाही. तरीदेखील ती भाव खाऊन गेली होती. त्यामुळे प्रेक्षकांना ती खूप भावली होती. त्यानंतर शालू म्हणजेच राजेश्वरी खरात हिने आयटमगिरी हा चित्रपट केला होता. या चित्रपटाला तिला जेमतेम यश मिळाले होते.

मात्र, ती सोशल मीडियातून चाहत्यांच्या संपर्कात असते. त्यामुळे तिची चर्चा नेहमीच होत असते. आता राजेश्वरी खरात हिंदी चित्रपटात येणार असल्याचे सांगण्यात येते. पुणे टू गोवा हा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटामध्ये तिची मध्यवर्ती भूमिका असणार आहे. या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक अमोल भगत करत आहेत.

तर या चित्रपटामध्ये ओमराजे मराठे हा अभिनेता दिसणार आहे. या चित्रपटाची कथा रोमान्स, ऍक्शन, थ्रिलर सस्पेन्स अशी असणार आहे. पुणे टू गोवा असा प्रवास करणाऱ्या खऱ्या कलावंताच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या घटना-घडामोडी धोकादायक वळणे या चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

Team Hou De Viral