राजीव कपूर यांना आवडत होती पद्मिनी कोल्हापुरे; परंतु या कारणास्तव होऊ शकले नाही लग्न..

राजीव कपूर यांना आवडत होती पद्मिनी कोल्हापुरे; परंतु या कारणास्तव होऊ शकले नाही लग्न..

अभिनेता ऋषी कपूर यांच्या मृ त्यूला एक वर्षही पूर्ण झाले नव्हते तेवढ्यात ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून चाहत्यांच्या मनामनात पोहोचलेले लोकप्रिय दिग्गज अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षाचे होते.

राजीव यांनी १९८३ च्या ‘एक जान हैं हम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपट सगळ्यात उत्कृष्ट चित्रपट ठरला, ज्यात ते अभिनेत्री मंदाकिनीसोबत दिसले होते. त्यावेळी त्यांचं नाव अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे सोबतही जोडलं गेलं.

राजीव यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. आधी त्यांनी आर के बॅनरमध्ये बनलेला चित्रपट ‘बीवी ओ बीवी’ चे सहाय्यक दिग्दर्शन केले. त्यानंतर खुद्द राज कपूर यांनीच राजीव यांना त्यांच्या सोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम दिलं होतं.

जेव्हा राज कपूर यांनी ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा ‘प्रेम रोग’ दिग्दर्शित केला, तेव्हा राजीव त्यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राजीव कपूर पद्मिनी यांच्या प्रेमात पडले होते. ‘प्यार का सिलसिला’ चित्रपटाच्या सेटवर ब्रेक मिळताचं राजीव आणि पद्मिनी एकमेकांशी खूप गप्पा मारायचे.

राज कपूर जेव्हाही राजीव यांना शूटिंगसाठी बोलावत तेव्हा पद्मिनी त्यांच्या मेकअप रूममधून बाहेर पडत. या गोष्टी सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत गेल्या. मीडिया आणि मॅगझिन्समध्ये याबद्दल छापून येऊ लागलं.

या घटना राज कपूर यांना खटकू लागल्याने त्यांनी पद्मिनी यांना थेट इशारा दिला. जर या चित्रपटात काम करायचं असेल तर राजीव यांच्या सोबतचं बोलणं बंद करावं लागेल, अशा शब्दात त्यांना खडसावलं गेलं. पद्मिनी यांनी राजीव यांच्या जागी चित्रपटाची निवड केली आणि त्यांची प्रेमकहाणी तिथेच थांबली.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral