सर्वांना हसवणारा ‘हा’ अभिनेता रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर आहे

सर्वांना हसवणारा ‘हा’ अभिनेता रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर आहे

गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड मधून अनेक वाईट बातम्या समोर येत आहेत. अनेक कलाकारांना वेगवेगळ्या आजाराने ग्रासले आहे. तर अनेक कलाकारांचा अकाली मृत्यू झाला आहे.

नुकतेच मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदय विकाराचे झटक्याने मुंबईतील गिरगावात निर्माण झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आता देखील राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या जबरदस्त अशा विनोदाने सर्वांचे मन जिंकले आहेत. त्यांनी अनेक कॉमेडी शो केले आहेत. त्यांनी केलेले कॉमेडी शो प्रेक्षकांना प्रचंड आवडते आणि राजकारणात देखील सक्रिय असतात. मात्र समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करणे सुरू केले. राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव असे आहे.

त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 मध्ये झालेला आहे. उत्तर प्रदेशातल्या कानपूर मध्ये ते लहानाचे मोठे झाले. ते एक विनोद वीर म्हणून ओळखले जातात. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये त्यांनी स्टँड अप कॉमेडी करून नाव कमावले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अनेक चित्रपट प्रदर्शन वितरण सोहळ्यामध्ये त्यांनी सूत्रसंचालन तसेच आपले विनोद सगळ्यांना ऐकवले आहेत.

राजू श्रीवास्तव यांनी अनेक चित्रपटातही काम केले आहे. बाजीगर बॉम्बे टू गोवा, आमदनी अठन्नी खर्चा रुपया यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मात्र, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये त्यांनी एक वेगळीच आपली भूमिका वठवली होती. राजू श्रीवास्तव एक जबरदस्त असे विनोद वीर म्हणून देखील समोर आले आहेत.

बिग बॉसच्या तिसऱ्या सेशनमध्ये देखील ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी कॉमेडी का महा मुकाबला या शोमध्ये देखील सहभाग नोंदवला होता. नच बलिये या शोमध्ये देखील ते सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे कॉमेडी नाईट विथ कपिल या शोमध्ये देखील त्यांनी काही काळ काम केले. मजाक मजाक मे या शोचे सूत्रसंचालन देखील त्यांनी जबरदस्त रित्या केले होते.

त्यांनी अलीकडेच समाजवादी पार्टीमध्ये देखील प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली. मात्र यामध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये देखील प्रवेश केला होता. आता त्यांच्या बाबतीतली बातमी समोर आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे कळत आहे.

राजू श्रीवास्तव हे नेहमीप्रमाणे आपल्या जिम मध्ये गेले होते. जिम मध्ये व्यायाम करताना त्यांना अचानक त्रास सुरू झाला. त्यानंतर ते तिथेच बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर आता त्यांच्यावर 24 तास लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची प्रकृती देखील ठीक असल्याचे कळत आहे.

त्यांना 24 तास निगराणी खाली देखील ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे, तर आपल्याला राजू श्रीवास्तव आवडतात का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral