एकाच वेळी दोन्ही भावांची प्रकृती गंभीर, या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कुटुंबावर दुहेरी संकट

एकाच वेळी दोन्ही भावांची प्रकृती गंभीर, या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कुटुंबावर दुहेरी संकट

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती काल ढासळली असून त्यांच्यावर आता दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू श्रीवास्तव जिम मध्ये वर्कआउट करत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णाला दाखल करण्यात आले होते.

आता त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलण्यात येते. राजू श्रीवास्तव यांनी अनेक कॉमेडी शो मध्ये सहभाग घेऊन चाहत्यांना मंत्रमुग्ध केले होते. राजू श्रीवास्तव हे अफलातून असे विनोदवीर आहेत.

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या जबरदस्त अशा विनोदाने सर्वांचे मन जिंकले आहेत. त्यांनी अनेक कॉमेडी शो केले आहेत. त्यांनी केलेले कॉमेडी शो प्रेक्षकांना प्रचंड आवडते आणि राजकारणात देखील सक्रिय असतात. मात्र समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करणे सुरू केले. राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव असे आहे.

त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 मध्ये झालेला आहे. उत्तर प्रदेशातल्या कानपूर मध्ये ते लहानाचे मोठे झाले. ते एक विनोद वीर म्हणून ओळखले जातात. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये त्यांनी स्टँड अप कॉमेडी करून नाव कमावले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अनेक चित्रपट प्रदर्शन वितरण सोहळ्यामध्ये त्यांनी सूत्रसंचालन तसेच आपले विनोद सगळ्यांना ऐकवले आहेत.

राजू श्रीवास्तव यांनी अनेक चित्रपटातही काम केले आहे. बाजीगर बॉम्बे टू गोवा, आमदनी अठन्नी खर्चा रुपया यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मात्र, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये त्यांनी एक वेगळीच आपली भूमिका वठवली होती. राजू श्रीवास्तव एक जबरदस्त असे विनोद वीर म्हणून देखील समोर आले आहेत.

बिग बॉसच्या तिसऱ्या सेशनमध्ये देखील ते सहभागी झाले होते. आता नुकतीच बातमी समोर आली असून राजू श्रीवास्तव यांच्या भावाला देखील तिथेच दाखल करण्यात आले आहे. चार दिवसापूर्वी राजू श्रीवास्तव यांच्या भावाला न्यूरो संबंधित आजार झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे.

त्यांचे भाऊ चौथा मजल्यावर तर राजू श्रीवास्तव दुसऱ्या मजल्यावर सध्या उपचार घेत आहेत. त्यामुळे एकाच रुग्णालयात दोन भावांना दाखल करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी, असे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब चिंतेत आहे.

Team Hou De Viral