अबब ! आपल्या पश्चात एवढी संपत्ती सोडून गेले ‘राकेश झुनझुनवाला’, विमान कंपनी, 46 करोडोंचे विश्व आणि बरेच काही

अबब ! आपल्या पश्चात एवढी संपत्ती सोडून गेले ‘राकेश झुनझुनवाला’, विमान कंपनी, 46 करोडोंचे विश्व आणि बरेच काही

शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले गुंतवणूकदार आणि उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 6.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

झुनझुनवाला यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी 5.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब मागे सोडले आहे. त्यांच्या घरात पत्नीशिवाय तीन मुले आहेत. झुनझुनवाला हे 2 मुले आणि एका मुलीचे वडील होते.

भारतातील वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्टा आणि दोन मुले आर्यमन आणि आर्यवीर झुनझुनवाला असा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला यांनी 22 फेब्रुवारी 1987 रोजी रेखाशी लग्न केले. त्यांची मोठी मुलगी निष्ठा हिचा जन्म 30 जून 2004 रोजी झाला.

यानंतर 2 मार्च 2009 रोजी त्यांच्या पत्नीने आर्यमन आणि आर्यवीर या जुळ्या मुलांना जन्म दिला. राकेश झुनझुनवाला यांचे वडील राधेश्यामजी झुनझुनवाला आयकर अधिकारी होते. आणि त्यांची आई उर्मिला झुनझुनवाला गृहिणी होती. राकेश झुनझुनवाला यांचा मोठा भाऊ राजेश चार्टर्ड अकाउंटंट आहे. याशिवाय त्यांना दोन बहिणीही आहेत.

राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे ४६ हजार कोटी रुपये आहे. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे अकासा एअरमध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी आहे. दोघांची या कंपनीत एकूण 46% हिस्सेदारी आहे.राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीचे नाव RARE Enterprises आहे. यामध्ये सुरुवातीला RA म्हणजे राकेश आणि नंतर RE म्हणजे त्याची पत्नी रेखा.

त्यांनी आपल्या फर्मच्या माध्यमातून अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामध्ये टायटन, टाटा मोटर्स, क्रिसिल, अरबिंदो फार्मा, एमसीएक्स, फोर्टिस हेल्थकेअर, ल्युपिन या कंपन्यांचा समावेश आहे. राकेश झुनझुनवाला हे शेवटचे 7 ऑगस्ट रोजी आकासा एअरच्या लॉन्चमध्ये दिसले होते. त्यावेळी ते व्हीलचेअरवर दिसले होते.

झुनझुनवाला यांना स्ट्रीट फूड विशेषत: पावभाजी आणि डोसा खूप आवडायचा. राकेश झुनझुनवाला हे भारतातील 36 वे सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. 2017 मध्ये शेअर बाजारातील तेजीत टायटन कंपनीच्या शेअर्समधून त्यांनी एका दिवसात 900 कोटी रुपयांचा नफा कमावला.

Team Hou De Viral