Bigg Boss 14 : ‘एंटरटेनमेंट’च्या नादात राखी सावंतने ओलांडल्या सर्व मर्यादा, संतापले स्पर्धक

Bigg Boss 14 : ‘एंटरटेनमेंट’च्या नादात राखी सावंतने ओलांडल्या सर्व मर्यादा, संतापले स्पर्धक

‘बिग बॉस 14’ला एंटरटेनिंग बनवण्यासाठी मेकर्सने आता काय करावे तर ज्युली घेऊन आलेत. आता ही ज्युली कोण तर राखी सावंतच्या अंगात अधूनमधून संचारत असलेला आत्मा. होय, ड्रामा क्विन राखी सावंतने सध्या घरात भूताचे सोंग घेतले आहे. माझ्या अंगात ज्युलीचे भूत आहे, असे म्हणून राखी चित्रविचित्र गोष्टी करताना दिसते. तिच्या या कारनाम्यांमुळे घरातील स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत असले तरी अनेकदा फुटेज देण्याच्या नादात राखीचे भान सुटते. झाले असेच.

ज्युलीचे सोंग घेतलेल्या राखीने घरातील स्पर्धक राहुल महाजनसोबत असे काही केले की, अली गोनी व अन्य स्पर्धक रागाने लालबुंद झालेत.आज मंगळवारी टेलिकास्ट होणा-या एपिसोडचा प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे. यात राखी भूताच्या गेटअपमध्ये दिसतेय. मी घरात कोणालाच कॅप्टन बनू देणार नाही, असे म्हणत ती एकएका स्पर्धकाची छेड काढायला सुरुवात करते.

याचदरम्यान टास्कदरम्यान ही बया काय करते तर राहुल महाजनची धोती फाडते. हे पाहून सगळेच शॉक्ड होतात. अली गोनी, राहुल वैद्य, अभिनव शुक्ला राखीच्या या कृत्यामुळे प्रचंड संतापतात. हेच एखाद्या महिलेसोबत झाले तर चालेल का? असे म्हणत अली गोनी टास्क करण्यास स्पष्टपणे नकार देतो. यानंतर काय घडते,हे पाहण्यासाठी तुम्हाला आजचा बिग बॉस 14 चा एपिसोड पाहावा लागणार.

बिग बॉसमध्ये दिसणार राखी सावंतचा पती?

राखी याआधी देखील बिग बॉसच्या घरात झळकली होती. त्यावेळी तिच्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाऊन हंगामा करत आहे. बिग बॉसमध्ये राखी तिच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहे. राखीच्या लग्नाविषयी तिच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.

राखी सावंतच्या पतीला आजपर्यंत कोणीही पाहिले नाही. पण राखी बिग बॉसच्या घरात गेल्यापासून तिचा पती विविध वाहिन्यांना मुलाखती देताना दिसत आहे. आता तर एका मुलाखतीत रितेशने बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा वर्तवली आहे. रितशने एका मुलाखतीत सांगितले आहे की, मला बिग बॉसच्या ख्रिसमस स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावण्याबाबत विचारण्यात आले होते. पण त्यावेळी मी प्रचंड बिझी होतो.

पण मी कधी घरात जाऊ शकतो याविषयी मी कार्यक्रमाच्या टीमला सांगितले आहे. याबाबत मला जानेवरीच्या पहिल्या आठवड्यात वाहिनीद्वारे सांगण्यात येईल. घरात जाऊन मला राखीला सपोर्ट करायचा आहे. राखी ही खूपच चांगली व्यक्ती आहे. ती माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

Team Hou De Viral