Video; या अभिनेत्रीचा अजब दावा, म्हणते सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे.

Video; या अभिनेत्रीचा अजब दावा, म्हणते सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने नुकतेच असं काहीतरी केलं आहे त्यामुळे तिला जोरदार ट्रोल केले जात आहे. त्याचबरोबर तिला मोठ्याप्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे.नेमकं तिने केले तरी काय याबद्दल आपण जाणून घेऊया..

सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाने सर्वांनाच दु: ख झाले आहे, परंतु कदाचित राखी सावंत हिने या प्रकरणाला गांभीर्यने समजले नसावे. म्हणूनच तिने सुशांतसिंग राजपूत यांच्याबद्दल कुचबुच बोलायला सुरुवात केली. एक व्हिडिओ शेअर करत राखी म्हणाली की, सुशांत माझ्या स्वप्नात आला होता आणि त्याने राखीला सांगितले की, मी तुझ्या पोटातून जन्म घेईन.

होय! अशा गंभीर विषयावर कोणी असे कसे बोलू शकते हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेलच आणि त्याबरोबर राग देखील आला असेल. राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम वॉलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘मी रात्री झोपेत होते अचानक मला धक्का बसला. मी विचारले की कोण आहे,तर समोरून आवाज आला मी सुशांत.

सुशांतने मला सांगितले की मी पुन्हा जन्म घेत आहे हे माझ्या चाहत्यांना सांग. मी म्हणाले ते कसे तर तो म्हणाला की राखी तू लग्न करशील आणि मग मी तुझ्या गर्भातून जन्म घेईन. राखीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिच्यावर बरीच टीका आणि ट्रोल केले आहे. तसेच हा व्हिडिओ डिलीट करावा असे तिला सांगितले.

राखी संवतच्या या व्हिडिओवर एका युजरने कॉमेंट करत म्हटले की, ‘तुम्ही खूप असंवेदनशील आहात, असे केल्याने तुम्हाला स्वतःलाच लाज वाटायला पाहिजे.’ दुसर्‍या एकाने सांगितले की, ‘आपण सर्वांनी राखीच्या खात्यावर रिपोर्ट करावा.’

राखी सावंतचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1,098,272 वेळा पाहिला गेला आहे. सुशांतचे चाहते राखीला जोरदार ट्रोल करीत आहेत आणि तिचे अकाउंट ब्लॉक करण्याची विनवणी करत आहेत.

सुशांतने 14 जून रोजी मुंबईच्या घरी ग ळ फा स लावून आ त्म ह त्या केली. मात्र सुशांतच्या आ त्म ह त्ये चे कारण अद्याप समोर आले नाही. मीडिया रिपोर्टनुसार सुशांत सुमारे 6 महिन्यांपासून नै राश्या त होता. त्याबाबतची औषधेही त्याला चालू होती. परंतु काही काळासाठी त्याने वेळेत औषधे घेणे बंद केले होते.

आमच्या इतर बातम्या –

सुशांत सिंह राजपूत व अंकिता लोखंडे विषयी ‘ही’ गोष्ट आली आता सर्वांसमोर

सुशांत सोबतच्या ‘त्या’ इंस्टाग्राम चॅटचा स्क्रीनशॉट अर्जुन कपूरने केला शेअर ! जाणून घ्या त्या चॅटमध्ये होत तरी काय ?

Team Hou De Viral