शरीरात रक्ताची (ॲनिमिया) कमतरता झाल्यास हे करा पाच घरगुती उपाय.. होतील अद्भुत फायदे..

अनेकदा बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. सध्या अनेकांना शरीरातील रक्ताची कमतरता ही मोठ्या प्रमाणात जाणवत असते. रक्ताची कमतरता शरीरात झाल्यास याला ॲनिमिया म्हणतात.
ऍनिमिया झाल्यामुळे आपल्याला अनेक आजारांचा धोका होऊ शकतो. यामुळे आपल्याला शरीरातील रक्त हे कायम चांगले ठेवावे लागते. यासाठी सकस आहार, फळे भाजीपाला या प्रमाणात सेवन केले पाहिजे. तसेच व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभू शकते. नाहीतर आपण व्यसन केल्याचा आपल्याला फटका बसू शकतो. त्यामुळे आपण व्यायाम करून आणि चांगला आहार घेऊन यावर मात करू शकता.
आम्ही आपल्याला आज या लेखांमध्ये याबाबतची माहिती सांगणार आहोत. एनीमियाचे लक्षण आढळल्यास आपल्या रक्तपेशी या कमी होतात. आपल्याला थकवा जाणवतो. श्वास घेण्यास त्रास होतो आपल्या हार्टबीट या वाढल्या जातात आणि परिणामी याचा आपल्याला गंभीर परिणाम होऊ शकतो. आयर्न आपल्या शरीरातील कमी झाले तरी याचा आपल्याला त्रास होतो.
1) हिरव्या पालेभाज्या : आपल्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी आपण हिरव्या पालेभाज्या चे सेवन मोठ्या प्रमाणात करावे. यामुळे आपल्याला रक्त कमी पडणार नाही आणि आपल्या शरीरातील रक्त वाढेल यासाठी आपण हिरव्या पालेभाज्यांचे सेवन नियमित पणे केले पाहिजे. यामध्ये आवश्यक पोषक तत्वे असतात आणि याचा सलाड सारखा देखील आपल्याला उपयोग करता येईल.
2) फळे : फळे हे शरीराला खूप आवश्यक असतात. असे असूनही अनेक लोक फळांचे सेवन नियमितपणे करत नाहीत. फळांमध्ये मोठे पोषकतत्वे असतात. फळे घेतल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन हे वाढीस लागते. आपण कधीही डाळिंब, केळी याचे सेवन हे केले पाहिजे. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते आणि आयर्न देखील मिळते. डाळिंब आणि सेफ याचे आपण सेवन करू शकता. यामुळे आपल्याला पोषक तत्त्वे मिळतात.
3) विटामिन सी : आपल्या शरीरातील विटामिन सी चे प्रमाण कमी झाल्यास आपल्याला ॲनिमिया यासारखी समस्याही निर्माण होऊ शकते. आपण आयर्नची गोळी घेत असल्यास आपल्याला विटामिन सी युक्त फळे खाणे हे अतिशय गरजेचे असते. यासाठी आपण लिंबूवर्गीय फळे खाल्ले पाहिजेत. यामध्ये लिंबू, संत्रा स्ट्रॉबेरी किवी असे फळ घेतले पाहिजे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे ॲनिमियाची समस्याही दूर होऊ शकते.
4) बदाम : ॲनिमियामुळे आपल्या शरीरातील रक्त हे कमी होते. रक्त वाढीचा उपाय आपण बदामाच्या स्वरुपात देखील करू शकता. रात्री झोपण्याआधी सात-आठ बदाम भिजवून ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या याचे साल काढून बदामाचे सेवन करावे. यामुळे आपल्याला ॲनिमियाची समस्याही होणार नाही. बदामामध्ये फायबर आणि इतर पोषक तत्वे खूप असतात. यामुळे आपण याचे सेवन केले पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.