तब्बल ’34’ वर्षानंतर ‘ह्या’ प्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय कलाकार जोडी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

तब्बल ’34’ वर्षानंतर ‘ह्या’ प्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय कलाकार जोडी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

छोट्या पडद्यावर रामायण ही ऐतिहासिक मालिका आजही खूप पसंत केली जाते. 34 वर्षांपूर्वी आलेली ही मालिका देशात लोकप्रिय ठरली होती. जेव्हा ‘रामायण’ टीव्हीवर यायचे तेव्हा लोक काम सोडून टीव्हीला चिकटून बसायचे. तसेच रामायण ज्यावेळेस सुरू झाले त्यावेळेस लोक हे टीव्हीची देखील पूजा करायचे.

रस्त्यावर जणू काही कर्फ्यू लागला अशी परिस्थिती असायची. कारण की या मालिकेची लोकप्रियता एवढी होती. रामायणचे दिग्दर्शन दिवंगत ज्येष्ठ दिग्दर्शक रामानंद सागर यांनी केले होते. त्यात काम केलेल्या प्रत्येक कलाकाराला मोठी ओळख मिळाली. या मालिकेत भगवान श्रीरामाची भूमिका अभिनेता अरुण गोविल‌ यांनी साकारली होती.

अरुण गोविल यांनी आजवर अनेक चित्रपटात, मालिकांमध्ये काम केले. मात्र, ते आजही रामाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. प्रभू रामाची भूमिका साकारून अरुण गोविल घरोघरी प्रसिद्ध झाले. लोकांनीही त्यांना जणू देवाचा दर्जा द्यायला सुरुवात केली होती. ते‌ ज्या कार्यक्रमासाठी जायचे तिथे त्यांना सन्मान मिळायचा.

काही भागात तर लोक त्यांना देव म्हणून पाया देखील पाडायचे. याच मालिकेमध्ये सीतेची भूमिका देखील प्रचंड गाजली होती. सीतेची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी साकारली होती. त्यानंतर दीपिका यांना अनेक पौराणिक मालिकांमध्ये काम मिळाले. तसेच त्यांना काही चित्रपटात देखील काम मिळाले.

मात्र, चित्रपटात काम केल्याने त्यांची प्रतिमा ही जनसमान्यांमध्ये खराब झाल्याची चर्चा देखील त्यावेळेस होती. त्यानंतर त्यांना मालिका आणि चित्रपटात काम मिळणे बंद झाले, असे देखील सांगण्यात येते. काही दिवसापूर्वी अरुण गोविल हे विमानतळावरून कुठेतरी जात असताना एका महिलेने त्यांचे पाय धरले.

साक्षात रामाचे दर्शन झाले, असे त्या महिलेने म्हटले होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली होती. आता प्रेक्षकांना राम आणि सीतेची जोडी पुन्हा एकदा पाहता येणार आहे. म्हणजेच अभिनेते अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया हे लवकरच आपल्याला झलक दिखला जा या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाल्याचे दिसणार आहे.

दिवाळीदरम्यान या विशेष भागाचे प्रसारण होणार आहे. या विशेष भागासाठी या दिग्गज कलाकारांना बोलवण्यात आले आहे. आणि दोघांनी देखील हे आमंत्रण स्वीकारले असून राम- सीतेची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना या शोच्या माध्यमातून पाहता येणार आहे, तर आपण रामायण ही मालिका पाहिली का या रामायणामधील आपल्याला सगळ्यात जास्त भूमिका कोणाची आवडली होती, आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral