चित्रपट सृष्टीत खळबळ ! प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर, प्रकृती अतिगंभीर

चित्रपट सृष्टीत खळबळ ! प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर, प्रकृती अतिगंभीर

आपल्या दिल खेचक आदांनी बॉलिवूडला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे रंभा ही होय. मात्र, आता रंभा हिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रंभा हिचा अपघात झाला आहे. होय आपण जे ऐकले ते खरे आहे.

रंभा हिचा भारतात नाहीतर परदेशात म्हणजेच कॅनडा येथे अपघात झाला आहे. या अपघातात रंभा ही जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे, तर रंभा हिने याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती देखील दिली आहे. रंभा हिने आजवर बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले. तिने काम केलेल्या सगळ्याच भूमिका या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत.

रंभाने याबाबत माहिती देताना सांगितले की, मी माझ्या मुलांना शाळेतून आणत असताना आमच्या गाडीला दुसऱ्या गाडीने धडक दिली. यावेळी गाडीत माझ्यासोबत मुले आणि माझे नौकर होते. हा अपघात झाला असला तरी आता आम्ही सर्व सुरक्षित आहोत. आम्हा सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

मात्र माझी छोटी साशा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेची सर्वाधिक गरज आहे, असे रंभा हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. रंभाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट करत आहेत आणि रंभा आणि तिच्या मुलीसाठी प्रार्थना करत आहेत.

रंभा हिने अनेक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ‘जुडवा’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘क्यूंकी में झूठ नहीं बोलता’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये तिने अतिशय जबरदस्त असे काम केले आहे. घरवाली बाहरवाली या चित्रपटातील तिची भूमिका जर अतिशय पाहण्यासारखी होती.

रंभाने तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, भोजपूरी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांपासून दूर असलेल्या रंभाने 8 एप्रिल 2010 मध्ये इंद्र कुमार पद्मनाथनसोबत विवाह केला. इंद्र मॅजिकवुड्स नावाच्या कंपनीचे सीईओ आहेत. कॅनडातील ही कंपनी किचन कॅबिनेट आणि बाथरुम व्हॅनिटीज बनवते.

रंभा तिचे पती आणि तीन मुलांसह आता कॅनडात स्थायिक झाली आहे. 13 जानेवारी 2011 रोजी रंभाने पहिली मुलगी लान्या आणि 31 मार्च 2015 रोजी लहान मुलगी सायशाला जन्म दिला. कॅनडामध्ये देखील रंभा हिला अनेक जण ओळखतात. तसेच तिला पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये काम करण्यास प्रोत्साहित करतात.

मात्र, रंभा हिने सांगितले की, आता बॉलीवूडमध्ये मी काम करणार नाही.

Team Hou De Viral