ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला ‘अभिनय’ क्षेत्रात नव्हे तर आर्मीमध्ये करायचं होतं करिअर; परंतु…

ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला ‘अभिनय’ क्षेत्रात नव्हे तर आर्मीमध्ये करायचं होतं करिअर; परंतु…

अभिनेता हार्दिक जोशी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने कोल्हापूरच्या रांगाड्या गड्याची भूमिका साकारली होती. या मालिकेने केवळ हार्दिकच नव्हे तर त्याची जोडीदार अक्षया देवधरही विशेष लोकप्रिय झाली. प्रेक्षकांनी या जोडीवर विशेष प्रेम केले.

दरम्यान अलीकडेच या जोडप्याने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याचीही विशेष चर्चा झाली होती. आता या जोडीने होम मिनिस्टरमध्ये उपस्थिती दर्शवली. यावेळी या दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विविध घटना सांगितल्या. हार्दिकने अशीही माहिती दिली की त्याला कधी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकायचे नव्हते.

अक्षया आणि हार्दिक यांची लग्नानंतरची ही पहिलीच मकर संक्रात होती. होम मिनिस्टरच्या मकर संक्रांत स्पेशल एपिसोडमध्ये या जोडीने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी हार्दिकने त्याला अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते याविषयी भाष्य केले. हार्दिकने यावेळी सांगितलं की तो बालपणी मुंबईच्या अँटॉप हिल याठिकाणी राहायचा तर त्याची शाळा दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये होती.

अभिनेत्याने पुढे हेही सांगितलं की त्याची आजी उत्तम पेटीवादक होती असून त्या दादरच्या एका भजनीमंडळाच्या प्रमुख होत्या. त्यांचे निधन झाले तेव्हा हार्दिक खूप लहान होता. हार्दिक म्हणाला की त्याला तेव्हा वाटले नव्हते की तो भविष्यात कला क्षेत्रामध्ये कधी येईल. अभिनेता यावेळी पुढे म्हणाला की, ‘मला लहानपणाबासून आर्मीचं वेड होतं, मला आर्मीमध्ये जायचं होतं. माझा अभ्यासही सुरू होता.

कॉलेज आणि त्यानंतर UPSC चा अभ्यास सुरू होता. मी चंदीगढमध्ये ट्रेनिंगही घेतलं होतं. अजूनही माझे अनेक मित्र आर्मी ऑफिसर आहेत. त्याठिकाणाहून आल्यानंतर ६ महिन्यांचा अवधी होता, तेव्हा काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात आलं.’ अभिनेता पुढे म्हणाला की, ‘मला माझ्या मित्रांनी त्यावेळी मॉडेलिंग कर असे सांगितले. मी म्हणून मॉडेलिंग करू लागलो. त्यानंतर काही मालिकांमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची भूमिका मिळाली.’

अभिनेत्याने यावेळी हापूस सिनेमाचा किस्साही सांगितला. तो म्हणाला की हापूस सिनेमात त्याला आणि त्याच्या दादाला भूमिका मिळाली होती. दोघांनाही आंबे खायचे होते आणि एकही संवाद नव्हता. त्यांच्या याच सीनचे अनेक रीटेक झाले. हार्दिक पुढे म्हणाला की, ‘त्यानंतर या क्षेत्रात परत येऊया असं वाटलं नव्हतं. मी नाटक, एकांकिका असंही काही केलं नव्हतं.

त्यानंतर हळूहळू मी कामगार कल्याण नाट्यमंडळात दोन अंकी नाटक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी स्वत:च्या उणीवा समजून लिहून काढल्या. त्यानंतर मला राणादाचं पात्र मिळालं होतं.’

Team Hou De Viral