धक्कादायक : मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचा मोठा निर्णय

धक्कादायक : मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचा मोठा निर्णय

बॉलीवूडमध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारी जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची आहे. या दोघांनी एप्रिल महिन्यात लग्न केले. त्यानंतर आता आलिया भट्ट हिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. तिच्या गरोदरपणाच्या बातम्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ब्रह्मास्त्र चित्रपट लवकरच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जेमतेमच प्रतिसाद मिळाला. आलिया भट्ट हिने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तिच्याकडे अत्याधुनिक व्हॅनिटी व्हॅन आहे.

आलिया भट हिने स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटातून आपली अभिनयाची ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. आज ती आघाडीची अभिनेत्री बनली आहे. आलिया हिच्या व्हॅनिटीचे डिझाईन गौरी खान हिने केल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत अजून पुरावा सापडला नाही. लॉक डाऊनमध्ये आलिया ही रणबीर कपूर यासोबतच राहिली होती.

काही वर्षापूर्वी आलिया भट्ट हिने अत्याधुनिक अशी व्हॅनिटी खरेदी केली आहे. तिच्या या व्हॅनची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. आलिया भट आणि रणबिर कपूर यांनी सहा नोव्हेंबर रोजी एका गोड कन्यारत्नाला जन्म दिला आहे. सहा नोव्हेंबर रोजी सकाळी आलिया भट हिला प्रसव वेदना सुरू झाल्या. त्यानंतर तिला सकाळी साडेसात वाजता तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया भट हिला मुलगी झाल्याची बातमी प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणात वायरल झाली. त्यानंतर दिवसभर हीच बातमी सोशल मीडियासह माध्यमांमध्ये झळकली. मात्र, आता आलिया भट आणि रणबीर कपूर यांची मुलगी कशी दिसते हे जाणून घेण्यासाठी तिचा फोटो पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत.

मात्र, आलिया भट आणि रणबीर कपूर आपल्या मुलीचा फोटो कोणालाच दिसू देणार नाहीत, असे त्यांनी ठरवले असल्याची माहिती मिळाली आहे. कारण की जो कोणी मुलीला भेटायला रुग्णालयात येतो त्याला फोटो काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण की मुलीचा फोटो कोणी काढला तर तो व्हायरल होऊ शकतो. त्यामुळेच तो आता कुणीही काढताना दिसणार नाही.

आलियाला भेटायला जाताना सोबत मोबाईल नेण्यास मनाई आहे. त्याचबरोबर इतर कारण देताना सांगण्यात आले आहे की, मुलीला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी आतमध्ये निवडक लोकांनाच प्रवेश देण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी बॉलीवूडचा दिग्दर्शक निर्माता करण जोहर हा लंडनहून भारतात परतला. त्यानंतर त्याने सुरुवातीला कोरोनाची चाचणी केली.

त्यानंतरच तो आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या मुलीला भेटायला गेला होता, तर आपले याबद्दल काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral