‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

रंग माझा वेगळा ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत आपल्याला कार्तिक आणि दीपा यांची प्रेम कहाणी पाहायला मिळत आहे. मात्र, या दोघांची नाते अधून मधून पुन्हा अबोल होत असल्याचे दिसत आहे. कार्तिक हा कायमच दीपा हिच्यावर शंका घेताना दिसत असतो.

त्यामुळे या दोघांची नाते पुढे टिकल की नाही याबाबतही अनेकांच्या मनात साशंकता निर्माण झाल्याचे देखील दिसत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला कार्तिकच्या भूमिकेमध्ये अभिनेता आशुतोष गोखले हा दिसला आहे. आशुतोष गोखले हा अतिशय दिग्गज असा अभिनेता आहे. त्याने या आधी अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे.

तसेच या मालिकेमध्ये आपल्याला दीपाच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे ही दिसली आहे. या मालिकेमध्ये नुकत्याच झालेल्या भागामध्ये आपण असे पाहिले आहे की, तुळशीचे लग्न लावत असताना मालिकेमध्ये सुजय हा तिथे येतो आणि म्हणतो की, आपल्या मुली कुठे आहेत हे ऐकल्यानंतर कार्तिक याच्या भुवया उंचावतात आणि तो दीपा हिच्याकडे शंका शंकेने पाहायला लागतो.

त्यामुळे या दोन्ही मुली आपल्या नाहीत, असे त्याला वाटायला लागते. त्यामुळे या मालिकेमध्ये नेमके आता काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आता उत्सुक आहेत. मालिकेमध्ये वेगवेगळे रंजक वळण मिळत असतानाच या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आल्याचे पहायला मिळत आहे. या मालिकेमध्ये श्वेता ही भूमिका अतिशय लोकप्रिय होताना दिसत आहे.

श्वेताची भूमिका अभिनेत्री अनघा भगरे हिने साकारली आहे. अनघा भगरे ही प्रसिद्ध ज्योतिष्यशास्त्र अतुल शास्त्री भगरे यांची मुलगी असल्याचे सांगण्यात येते. श्वेता हिने या मालिकेमध्ये अतिशय नकारात्मक भूमिका साकारली आहे. तिने ही भूमिका नकारात्मक साकारली असली तरी तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

श्वेताची भूमिका अनघा भगरे हिने अतिशय उत्कृष्ट रित्या साकारल्याचे दिसत आहे. मात्र, आता मालिकेतून एक बातमी नुकतीच समोर आली आहे. अनघा भगरे हिने ही मालिका आता सोडली असल्याची चर्चा रंगली आहे. याचे कारण मात्र कळू शकले नाही. मात्र, आता या मालिकेमधून तिने काढता पाय घेतला असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे आता आपल्याला या मालिकेमध्ये श्वेताच्या भूमिकेमध्ये अनघा ही दिसणार नाही, तर आपल्याला रंग माझा वेगळा ही मालिका आवडत होती का? या मालिकेतील सगळ्यात जास्त भूमिका आपल्याला कुठली आवडत होती, आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral