डोळ्याखाली येणाऱ्या ‘रांजणवाडी’ वर घरगुती रामबाण उपाय, रांजणवाडी कमी झाली म्हणून समजा..

पुर्वीच्या जमान्यामध्ये लोक हे फोनचा वापर केवळ लँडलाईन असाच करत होते. मात्र, मोबाईलमुळे क्रांती झाली आणि मोठ्या प्रमाणात मोबाईल सर्वांच्या हाती आले. तसेच टीव्ही, लॅपटॉप, संगणक वापराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे सहाजिकच डोळ्यावर मोठा ताण पडत आहेत. जे लोक मोबाईल, संगणक, टीव्ही असा वापर कमी करतात. त्यांच्या डोळ्यावर ताण हा कमी येतो.
मात्र, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापर करण्यामुळे डोळ्यावर ताण पडतो आणि यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागते.यामुळे डोळ्यांचे अनेक आजार उद्भवतात. डोळ्यात जळजळ होणे, पु येणे पाणी येणे असे आजार होतात. असेच रांजणवाडी येणे हा देखील एक आजार होतो. रांजणवाडी आल्यावर आपल्याला असाह्य वेदना होत असतात. यावर आम्ही आपल्याला उपाय सांगणार आहोत.
रांजणवाडी, सामान्यतः डोळ्याजवळ एका फोडासारखी दिसते. रांजणवाडी ही लहान आणि लाल रंगाची असते. यामध्ये पू असल्यामुळे मध्यभागी ती पिवळी दिसत असते. रांजणवाडीमुळे डोळ्याजवळ वेदना होतात. यामुळे पापण्या सुजल्यासारख्या दिसतात आणि यामधून पू बाहेर निघू शकतो. डोळ्याच्या हालचालीत अस्वस्थता वाटते, डोळ्यातून वारंवार पाणी येते आणि सतत डोळ्यात काहीतरी असल्यासारखे वाटते.
असे करा उपाय
रांजणवाडीचे निदान खूप सोपे आहे. त्यासाठी कोणत्याही तपासणीची आवश्यकता नसते. मात्र, काही लोक घाबरून जाऊन डॉक्टरांकडे जातात आणि खूप पैसे खर्च करतात. असे न करता आपण घरगुती उपाय देखील करू शकता. मात्र, रांजणवाडी थोड्या दिवसात आपोआपच बरी होते. जर ती बरी नाही झाली किंवा सतत वेदना होत असेल, तरच आपण एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर औषधोपचार घ्यावे.
आवश्यक असल्यास, संक्रमण बरे करण्यासाठी आणि बॅक्टेरियाचा नाश करण्यासाठी डॉक्टर अँटीबायोटिक्स दिले जातात. रांजणवाडीने प्रभावित भागात पू साचल्यामुळे खूप दबाव पडत असेल, तर काप मारुन पस काढला जातो. डोळ्यांचे आजार टाळण्यासाठी आपण स्वतः स्वच्छता राखली पाहिजे. सतत हात आपले डोळ्यांना लावले नाही पाहिजे.
कारण आपल्या हातावर आणि किटाणू बसलेले असतात. हे किटाणू आपल्या डोळ्यांमध्ये जातात आणि आपल्याला असे आजार जडू शकतात. त्यामुळे हाताची स्वच्छता नेहमी ठेवलीच पाहिजे. कोरोना महामारीमुळे आपण हाताची स्वच्छता राखणे हे चांगल्या प्रकारे शिकलो आहोत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.