सिद्धू मुसेवालानंतर आता ‘या’ प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या..

काही दिवसांपूर्वी पंजाबचा प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धार्थ मुसेवला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात आता वेगळेच वळण मिळाले. याचे देखील समोर येत आहे. कारण की या प्रकरणात पुणे शहरातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी संशयित संतोष जाधव याचा साथीदार महाकाल उर्फ सौरभ हिरामण कांबळे याला पुणे पोलिसांच्या ग्रामीण पथकाने अटक केली आहे. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मूसेवाला खून प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष हल्ल्याशी संबंध नसला तरी त्याने या प्रकरणात रेकी केल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. पुण्यातील मंचर येथील सराईत गुन्हेगार ओमकार ऊर्फ अण्णासाहेब बाणखेले याच्या ऑगस्ट 2019 मधील खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधव याला आश्रय दिल्याप्रकरणी कांबळेला अटक करण्यात आली होती.
विशेष म्हणजे त्याला 20 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितले. बाणखेले खून प्रकरणातील फरार आरोपी संतोष जाधवला आश्रय दिल्याने कांबळे याला अटक करण्यात आली आहे. मुसेवला हत्याप्रकरणी आत्ताच भाष्य करता येणार नाही.
मात्र, त्याचा या प्रकरणात सहभाग असू शकतो, असे त्यांनी सांगितले. महाकाळ मुळचा नारायणगाव जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. काही वर्षापूर्वी त्याच्या मातोश्रीचे निधन झाले आहे. संतोष जाधव सोबत तो फिरत असे. मात्र, यापूर्वी त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही, असे तपासात आढळून आले आहे.
त्यामुळे पोलिस आता सर्व बाजूने तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणामध्ये वादळ कमी होत नाही तोच एका प्रसिद्ध पाश्चात्य देशातील गायकाची देखील गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सिद्धू मूसेवाला या प्रसिद्ध पंजाबी गायकाची हत्या करण्यात आल्यानंतर अटलांटिका येथील प्रसिद्ध रॅपर ट्रबल याची ही हत्या करण्यात आली. सिद्धू याची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, 34 वर्षीय ट्रबल याचे खरे नाव वेगळच आहे. तो रविवारी पहाटे तीन वाजता राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला आहे.
घरगुती वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. आता ट्रबल याची हत्या नेमकी कुठल्या कारणाने केली याचा तपास देखील पोलीस घेत आहेत. सर्व बाजूनी हा तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.