‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील ही अभिनेत्री सोडणार मालिका

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील ही अभिनेत्री सोडणार मालिका

माझी तुझी रेशीमगाठ ही झी मराठी वरील मालिका आहे. या मालिकेने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे आणि ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची अतिशय आवडती मालिका बनत जात आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने अतिशय कमी वेळेत यश प्राप्त केले आहे. या मालिकेत दिवसेंदिवस नवीन वळण येत आहेत. नेमके पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. सध्या या मालिकेत आपण पाहिले आहे की, समीर आणि यश एक नवीन प्लॅन आखतात व त्यानुसार जुनी गर्लफ्रेंड वापस येते.

तिचे नाव जेसिका असे असते. समीर नेहाला सांगतो की ही यशची एक्स गर्लफ्रेंड आहे. यावर नेहा थोडी उदास होते. यानंतर यश आणि जेसिकाची वाढती जवळीकता पाहून नेहा खूप अस्वस्थ होत असते. ही गोष्ट समीरच्या लक्षात येते आणि आपला प्लान यशस्वी होणार याची त्याला खात्री वाटू लागते.

नेहा यशला समजावण्याचा प्रयत्न करते की, जेसिका ही तुझे पहिले प्रेम आहे आणि खूप नशिबाने आपले पहिले प्रेम आपल्याला पुन्हा मिळत असते. त्यामुळे तू जेसिकाशी लग्न कर. यावर यश ला आश्चर्य वाटते. पण समीर देखील यशला हेच समजतो की, तू जेसिकाशी लग्न करण्याचे नाटक कर. मग नक्कीच नेहा तिच्या मनातले तुला सांगेल.

त्यानुसार समीर नेहाला सांगतो की तू आणि शेफाली दोघी जणी जेसिकाच्या लग्नाला यायचे आणि तिथे नेहा येते व जेसिकाच्या कानाखाली एक लगावते. आणि म्हणते की, तू यशला फसवत आहेस. पैसे घेऊन तू पळून जाणार आहेस, हे मला कळले आहे. त्यामुळे यश सोबत तुझे लग्न होऊ शकत नाही.

यावर यश म्हणतो की, तुला काय फरक पडतो माझे चांगले झाले अथवा वाईट झाले तर? का तू माझ्यासाठी रोज टिफिन आणतेस? का तुझी घालमेल होत आहे? माझे वाईट होऊ नये, असे का वाटते? असे अनेक प्रश्‍न नेहाला यश विचारतो. त्यावर नेहा आपल्या प्रेमाची कबुली हळुवारपणे देते. या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली असली तरी या दोघांसमोर अनेक अडचणी आहेत.

जेसिका आता यशच्या आयुष्यातून पुन्हा दूर जाणार हे मात्र नक्की. जेसिकाचे खरे नाव जेन कटारिया असे आहे. जेनने अनेक मालिका व जाहिरातीत काम केलेले आहे. जेन कटारिया ही रशियन अभिनेत्री असून मॉडल देखील आहे. जेनने तमन्ना भाटियासोबत एका जाहिरातीत काम केलेले आहे.

तमन्ना सोबतचा एक सुंदर फोटो देखील जेनने शेअर केला आहे. ती साडी मध्ये आहे. आपल्या फिटनेससाठी खूप काळजी घेते. ती सातत्याने जिममध्ये दिसते. इन्स्टाग्राम वर जेन ही तिचे अनेक फोटो शेअर करत असते.

Team Hou De Viral