‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील हा अभिनेता दिसणार अर्जुन रामपाल सोबत हिंदी चित्रपटात, जाणून घ्या त्याबद्दल

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील सर्व पात्र हे खूप गाजले होते. रात्र झाली की या मालिकेची उत्सुकता अनेकांना असायची. या मालिकेमध्ये शेवंता, अण्णा नाईक यांच्या भूमिका चांगल्या गाजल्या होत्या. यासोबतच आदेश पायगुडे याची भूमिका देखील खूप गाजली होती. या मालिकेत त्याने पाटणकर नामक भूमिका साकारली होती.
मराठी मालिका गेल्या अनेक वर्षापासून चांगले परफॉर्मन्स करत आहेत. काही वर्षांपूर्वी दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या पुस्तकावर आधारित दिग्दर्शक केदार शिंदे यांनी श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका काढली होती. या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी अतिशय सुंदर असे काम केले आहे. या मालिकेतील भूमिका खूप गाजल्या होत्या. रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रचंड चालली होती.
मालिकेचा पुढचा भाग प्रकाशित करावा, असा आग्रह देखील मोठ्या प्रमाणात होता. मात्र, ही मालिका बंद करण्यात आली. या मालिकेतील अभिनेता आदेश पायगुडे लवकरच अर्जुन रामपाल सोबत दिसणार आहे. होय, अर्जुन रामपाल म्हणजे हिंदी चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव नेल पॉलिश असून या चित्रपटाची कथा ही कायद्या भोवती फिरणारी आहे.
एकदा कायद्याच्या चक्रात अडकले की माणूस त्यातून सुटत नाही, अशी पटकथा सांगणारे कांगोरे या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट एक जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या विषयी बोलताना आदेश पायगुडे म्हणाला की, हा चित्रपट मला मिळाला यासाठी मी अतिशय भाग्यदायी आहे. या चित्रपटात जीव ओतून काम केलेले आहे.
हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असे देखील तो म्हणाला. याआधी आदेश पायगुडे यांनी अनेक नाटक, चित्रपटात काम केले आहे. पुरुषोत्तम, फिरोदिया यासारखे नाटके गाजवून सोडले आहेत. याचे शिक्षण इंजिनिअरिंग पर्यंत झालेले आहे. मात्र, केवळ अभिनयाची आवड असल्याने तो चित्रपट सृष्टीकडे वळला आहे.
जाऊ द्याना बाळासाहेब, एक हजाराची नोट तुंबाड या सारख्या चित्रपटात त्याने अफलातून काम केले आहे. तसेच मालिकांमधून त्याने काम केले आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक काय कमेंट देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच प्रेक्षक मायबाप असल्याचे देखील आदेश पायगुडे याने सांगितले आहे. त्यामुळे या चित्रपटाला यश मिळो, अशी त्याने प्रार्थना केली आहे.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.