दुःखद ! भीषण कार अपघातात ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटचा झाला मृत्यू

दुःखद ! भीषण कार अपघातात ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटचा झाला मृत्यू

गेल्या अनेक दिवसांमध्ये अपघातामध्ये अनेक कलाकार आपल्याला सोडून गेल्याचे देखील पाहायला मिळते. कारण अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण गेल्या दशकभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढण्याचे देखील पाहायला मिळते. केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत अनेकदा चिंता देखील व्यक्त केली आहे.

रस्ता अपघातामध्ये मृत्यूमुखी होणाऱ्या लोकांची संख्या ही खूप जास्त असल्याचे त्यांनी सांगितले होते. अलीकडच्या काळामध्ये मराठी चित्रपट तसेच मालिका विश्वामध्ये आघाडीची अभिनेत्री कल्याणी जाधव हिचे देखील कोल्हापूर येथे अपघातात निधन झाले. ती रस्त्यावर उभी असताना यावेळेस टेम्पोने तिला जोरदार धडक दिली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. अशाच प्रकारे अनेक सेलिब्रिटी देखील आपल्याला सोडून गेल्याचे आपण गेल्या काही वर्षात पाहिले आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आघाडीचे अभिनेते असलेले आनंद अभ्यंकर यांचा देखील कार अपघातामध्ये काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबत त्यांचा सह कलाकार असलेला अक्षय पेंडसे आणि त्याचा एक वर्षाचा मुलगा देखील या अपघातात गेला होता.

त्यामुळे त्यावेळेस प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात आली होती. अलीकडच्या काळामध्ये देखील गोव्यामध्ये एक नवीन अभिनेत्री देखील मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे कार चालवताना अतिशय चांगल्या रीतीने कार चालवावी, असे अनेकांनी म्हटले आहे. मात्र तरी देखील काही जणांचे कार वरील नियंत्रण सुटते आणि त्यानंतर अपघातांची मालिका सुरू होते.

आता देखील एका अशाच नवेदित सेलिब्रेटीचा कार अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. कारण की या सेलिब्रिटीने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपली ओळख निर्माण केली होती. सोशल मीडियाच्या जगामध्ये तो खूपच लोकप्रिय होता. इंस्टाग्राम युट्युब त्याचप्रमाणे फेसबुक या माध्यमांवर तो अतिशय लोकप्रिय पद्धतीने आपले व्हिडिओ शेअर करून प्रसिद्धी मिळवत होता.

आम्ही ज्या कलाकाराबद्दल बोलत आहोत त्या कलाकाराचे नाव रावडी भाटी असे आहे. रावडी हा अनेकदा सोशल मीडियावर आपले व्हिडिओ टाकायचा. त्याच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यू मिळायचे आणि या माध्यमातून तो खूप मोठा स्टार बनला होता. त्याचबरोबर तो खूप पैसे देखील या माध्यमातून कमवायचा.

अलीकडेच मित्रांसोबत तो दिल्ली येथे गेला असता ग्रेटर नोएडा येथे त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि कार डायरेक्ट जाऊन झाडाला धडकली. यामध्ये रावडी याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आपल्याला रावडी आवडत होता का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral