‘पुष्पा’ चित्रपटात ‘भितीदायक’ दिसणारी ही अभिनेत्री रिअल लाईफ मध्ये दिसायला आहे खुपचं सुंदर

‘पुष्पा’ चित्रपटात ‘भितीदायक’ दिसणारी ही अभिनेत्री रिअल लाईफ मध्ये दिसायला आहे खुपचं सुंदर

पुष्पा द राईज हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत.

हिंदीमध्ये हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम आणि इतर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. असे असले तरी या चित्रपटावर ऑनलाईन देखील उड्या पडत आहेत. अनेक जण हा चित्रपट आवर्जून पाहत आहेत. या चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातील सगळेच डायलॉग हे एकाहून एक सरस असे झालेले आहेत.

या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत नॅशनल क्रश असलेली रश्मिका मंदाना ही दिसली आहे. ओ सामे ओ सामे हे गाणं प्रचंड लोकप्रिय असे होत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये समंथा हिनेदेखील एक ॲटम सॉंग केले आहे. या एका आयटम सॉगसाठी तिने कोट्यवधी रुपये घेतल्याचे सांगण्यात येते. तसेच या चित्रपटातील इतर भूमिकादेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

यामध्ये कोंडा रेड्डी ही भूमिका ही लक्षणीय अशी झालेली आहे. या चित्रपटाचा मराठी वर्जन काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. हा मराठी ट्रेलर काही मिनिटांची तयार केला आहे. यामध्ये मराठी डायलॉग घालण्यात आलेले आहेत. हे डायलॉग देखील अनेकांनी पाहिले आहेत.

पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन च्या मधील आवाजाला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याने आवाज दिला आहे. श्रेयस तळपदे याचे काही दिवसांपूर्वीच आलू अर्जुन याने फोन करून कौतुक देखील केले होते. तसेच श्रेयस तळपदे हा सध्या माझी तुम्ही रेशीमगाठ या मालिकेत काम करत आहे.

या मालिकेच्या सेटवर देखील या चित्रपटाची जादू पाहायला मिळाली होती. या मालिकेत परी ची भूमिका करणारी बालकलाकार मायरा वायकुळ हिनेदेखील पुष्पा चित्रपटातील गाण्यावर नृत्य केले होते. आज आम्ही आपल्याला या चित्रपटामध्ये खूंखार भूमिका साकारणारी अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

अनसुया भारद्वाज हिने या चित्रपटामध्ये कोंडा रेडीं याच्या पत्नीची भूमिका साकारलेली आहे. कोंडा रेड्डी याने या चित्रपटामध्ये चंदन तस्कर ची भूमिका केली आहे. अनसुया हिने देखील खूंखार अशी भूमिका साकारली आहे. अनेक खून आणि दरोडे टाकणार्या कुटुंबाशी तिचा संबंध असतो. या चित्रपटामध्ये तिच्या भूमिकेने अनेकांच्या मनात दहशत देखील निर्माण झाली.

मात्र, वास्तविक जीवनामध्ये ती अतिशय ग्लॅमरस आणि सुंदर अशी आहे. चित्रपटामध्ये ती तिच्या पतीचा खून करण्याचा प्रयत्न करते. याचे कारण म्हणजे आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला तिला घ्यायचा असतो. वास्तविक जीवनामध्ये अनसुया भारद्वाज ही अतिशय सुंदर अशी आहे. ती सध्या अडोतीस वर्षांची आहे. टेलिव्हिजनवर ती अनेक भूमिका साकारत असते.

त्याच प्रमाणे तिला क्वीन ऑफ सास असेदेखील म्हटले जाते. नुकतेच सोशल मीडियावर अनुसयाचे फोटो शेअर झालेले आहेत. या फोटोमध्ये ग्लॅमरस आणि सुंदर अशी दिसत आहे. तर आपल्याला पुष्पा चित्रपटात अनसुया भारद्वाज हिने साकारलेली भूमिका आवडली का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral