‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील कीर्ती च्या खऱ्या लाईफबद्दल, पहा बॉयफ्रेंड सोबतचे फोटो

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील कीर्ती च्या खऱ्या लाईफबद्दल, पहा बॉयफ्रेंड सोबतचे फोटो

स्टार प्रवाह सुरू असलेली फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आता वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. नुकत्याच होणाऱ्या भागांमध्ये आपण पाहणार आहोत की, भाऊ हे जीजी अक्का यांना बोलत असतात की, बासुंदी खूप चांगली झाली होती. बासुंदीमध्ये जायफळ जरा जास्तच झाले.

मला पण झोपविण्याचा विचार आहे की काय? असे जीजी अक्कला म्हणतात. त्यावर काय जीजी अक्का चांगल्याच भडकतात. तुम्हाला म्हणायचे काय आहे, मला लक्षात येत नाही का? त्यावर भाऊ म्हणतात की, त्या दिवशी किर्तीची परीक्षा होती आणि तिच्या बासुंदी मध्ये जायफळ जास्त झाले होते आणि ती झोपेतून उठलीच नाही.

त्यामुळे तिची परीक्षा बुडाली. त्यावर जीजी अक्का जोरात ओरडतात. तुम्हाला काय म्हणायचे आहे. तुम्ही माझ्यावर आरोप करत आहात का, असे म्हणतात. त्यावर भाऊ जिजा अक्का यांना वारंवार विचारतात की, तू हे केले मला माहीत आहे. मी तुला आज पासून ओळखत नाही.

तुझ्यासोबत लग्न करू मला अनेक वर्ष झाले आहेत. त्यावर जीजी अक्का आक्रमक स्पष्टीकरण देऊ लागतात की, हो मीच बासुंदीमध्ये जायफळ आणि खसखस देखील मिसळली होती. त्यावर भाऊ म्हणतात की, मला हे वाटले होते. मग त्यावर तू तिला उठवण्याचा प्रयत्न का करत होतीस, असेदेखील भाऊ विचारतात.

त्या म्हणतात की, त्यानंतर मला खूप वाईट वाटत होते की, मी असे करायला नको होते. त्यामुळे मी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळेस कीर्तीही दारापाशी उभी राहून सगळं काही ऐकत असते. कीर्तीला खूप वाईट वाटते. त्यावर भाऊ याला म्हणतात की, तू असे का केलेस.

त्यावर जीजी अक्का म्हणतात की, प्रेमिलेच्या मुलाचे असे झालेले आहे. तिच्या मुलाला बायकोने सोडलेले आहे. मला देखील असेच वाटत होते की, आपल्या शुभम ला सोडून जाईल. कीर्ती मोठी पोलीस अधिकारी झाली तर शुभमचे काय अस्तित्व राहणार. त्यामुळेच मी तिच्या बासुंदी मध्ये जायफळ मिसळले.

माझा हेतू वाईट होता, त्यावर भाऊ तिला समजून सांगतात की, असे काही होणार नाही. हे दोघेही खूप चांगल्या प्रकारे संसार करतील, असे या मालिकेमध्ये आपण आता पाहणार आहोत. या मालिकेमध्ये कीर्ती ही भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर हिने साकारली आहे. समृद्धी केळकर अतिशय दर्जेदार अशी अभिनेत्री आहे.

तिचा जन्म 23 डिसेंबर 1995 रोजी ठाण्यामध्ये झालेला आहे. सध्या ती पंचवीस वर्षाची आहे. ठाण्यामध्ये तिचे प्राथमिक शिक्षण झालेले आहे. सरस्वती शाळेत तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर व्ही जी वझे कॉलेज मुंबई येथून तिने कॉमर्समध्ये पदवी मिळवलेली आहे.

सगळ्यात आधी ती ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत काम केले ही मालिका खूपच गाजली तर दोन कटिंग या सीरिजमध्ये देखील तिने काम केले होते. ही सिरीज देखील खूप चालली होती. समृद्धी हिच्या आईचे नाव मेधा आहे आणि वडिलांचे नाव सुनील असे आहे. तिला एक बहीण देखील आहे. तिचे नाव मानसी आहे.

तिच्या बॉयफ्रेंडचे नाव अक्षय आहे असे सांगण्यात येते. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. आपल्या कुटुंबाचे फोटो देखील ती शेअर करत असते. मालिकेच्या एका भागासाठी समृद्धी 22 हजार रुपये मानधन घेत असल्याचे सांगण्यात येते.

Team Hou De Viral