पहा मराठी मालिका विश्वातील अभिनेत्यांच्या खऱ्या आयुष्यातील आईंना

पहा मराठी मालिका विश्वातील अभिनेत्यांच्या खऱ्या  आयुष्यातील आईंना

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका या धुमधडाक्यात सुरू आहेत. यामध्ये काही मालिका या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत, तर काही मालिकांना जेमतेम यश मिळत आहे, तर या मालिका विश्वामध्ये काम करणारे अनेक कलाकार हे कसे असतात.

कुठे राहतात आणि काय करतात याबाबत जाणून घेण्याची माहिती अनेकांना हवी असते, तर मालिका विश्वात काम करणाऱ्या कलाकारांच्या आई कशा असतात, याबद्दलही अनेकांना जाणून घ्यायची असते तर आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती देणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया.

मंदार जाधव – मंदार जाधव आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सध्या दिसत आहे. मंदार जाधव याच्या आईचे नाव रिमा जाधव असे आहे. मंदार जाधव आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये जयदीपच्या भूमिकेत दिसत आहे.

अभिषेक देशमुख – आई कुठे काय करते या मालिकेमध्ये यशच्या भूमिकेमध्ये अभिषेक देशमुख हा आपल्याला दिसला आहे. अभिषेक देशमुख याच्या आईचे नाव वैशाली देशमुख असे असून त्याचे मालिकेतील अरुंधतीप्रमाणेच आपल्या आईप्रमाणे खऱ्या आयुष्यातही खूप चांगल्या पद्धतीने जमते.

आशुतोष गोखले – आशुतोष गोखले हा सध्या रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये कार्तिकच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहे. कार्तिक गोखले हा लोकप्रिय अभिनेता असून त्याचे वडील देखील अभिनेते आहेत. त्याच्या आईचे नाव सविता गोखले आहे.

संकेत पाठक – संकेत पाठक हा आपल्याला लग्नाची बेडी या मालिकेमध्ये राघवच्या भूमिकेत दिसला आहे. त्याची भूमिका अतिशय लोकप्रिय होताना दिसत आहे. संकेत पाठक याचे आईसोबत खूपच चांगल्या पद्धतीने जमते. त्याच्या आईचे नाव पद्मश्री पाठक आहे.

श्रेयस तळपदे – श्रेयस तळपदे सध्या आपल्याला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये दिसत आहे. या मालिकेमध्ये त्याने यशची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली आहे. श्रेयस तळपदे याचे त्याच्या आई सोबत खूप चांगल्या पद्धतीने जमते.

शशांक केतकर – शशांक केतकर हा लोकप्रिय अभिनेता आहे. होणार सुन मी या घरची या मालिकेतून त्याने अतिशय जबरदस्त असे काम केले होते. शशांक केतकर याच्या आईचे नाव शिल्पा केतकर असे आहे.

चेतन वडनेरे – चेतन वडनेरे आपल्याला सध्या शशांच्या भूमिकेत ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत दिसत आहे. या मालिकेमध्ये त्याची आणि अपूर्वाची जोडी देखील लोकप्रिय होताना दिसत आहे. चेतन वडनेरे याचे देखील त्याच्या आई सोबत खूप चांगले जमते.

Team Hou De Viral