आपल्या आवडत्या मालिकांमधल्या कलाकारांचे खरे नाव व वय

आपल्या आवडत्या मालिकांमधल्या कलाकारांचे खरे नाव व वय

मराठी चित्रपट सृष्टी आणि मालिका विश्वामध्ये सध्या अनेक कलाकार हे काम करताना दिसत आहेत. आपले आवडते कलाकार हे नेमके कुठे राहतात, काय करतात, त्यांच वय किती आहे आणि ते कसे दिसतात, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशाच काही कलाकारांबद्दल माहिती देणार आहोत या कलाकारांची वय किती आहे ते जाणून घेऊया

शिल्पा तुळसकर – अभिनेत्री शिल्पा तुळसकर आपल्याला सध्या तू तेव्हा तशी या मालिकेत काम करताना दिसत आहे. शिल्पा तुळसकरचा जन्म 10 मार्च 1977 रोजी झाला आहे. ती सध्या 44 वर्षाची आहे.

हार्दिक जोशी – हार्दिक जोशी हा जबरदस्त अभिनेता आहे हार्दिक जोशी यांनी तुझ्यात जीव रंगला या मालिकेत जबरदस्त काम केले होते. त्याचा जन्म 6 ऑक्टोबर 1988 रोजी झाला असून त्याचे वय 33 वर्ष आहे.

अमृता पवार – अमृता पवार ही अतिशय जबरदस्त अभिनेत्री असून तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. तिचा जन्म 15 डिसेंबर 1988 मध्ये झाला आहे. तिचे वय 33 वर्ष आहे.

संकर्षण कराडे – संकर्षण कराडे आपल्याला सध्या माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. त्याचा जन्म 22 जून 1990 रोजी झाला आहे. तो सध्या 32 वर्षाचा आहे.

मायरा वायकुळ – माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेच्या माध्यमातून मायरा वायकुळ ही घराघरात पोहोचली आहे. तिने मालिकेमध्ये परीची भूमिका साकारली आहे. तिचा जन्म 22 जुलै 2017 रोजी झाला असून तिचे वय पाच वर्ष आहे.

श्रेयस तळपदे – श्रेयस तळपदे हा सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्रेयस याचा जन्म 27 जानेवारी 1976 रोजी झाला आहे. सध्या तो 46 वर्षाचा आहे.

प्रार्थना बेहेरे – प्रार्थना बेहेरे ही देखील आपल्याला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये सध्या दिसत आहे. तिची नेहा ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेत तिने नेहाची भूमिका केली आहे. तिचा जन्म 5 जानेवारी 1983 रोजी झाला आहे सध्या ती 39 वर्षाची आहे.

अजिंक्य राऊत – अजिंक्य राऊत हा सध्या मन उडू उडू उडू झालं या मालिकेमध्ये आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये तो इंद्राची भूमिका साकारत आहे. अजिंक्य हा मूळचा परभणीचा रहिवासी आहे. अजिंक्य याचा जन्म 18 जानेवारी 1993 रोजी झाला आहे. सध्या तो 28 वर्षाचा आहे.

ऋता दुर्गुळे – ऋता दुर्गुळे ही सध्या मन उडू उडू झाल या मालिकेमध्ये दिसत आहे. अलीकडेच तिने प्रतीक शहा याच्यासोबत लग्न केले आहे. ऋता हिचा जन्म 12 सप्टेंबर 1993 रोजी झाला आहे. ती सध्या 28 वर्षाची आहे. आगामी टाईमपास 3 या चित्रपटात ती पालवी पाटीलच्या भूमिकेत दिसणार आहे.

स्वप्निल जोशी – स्वप्निल जोशी हा आपल्या कारकिर्दीमध्ये श्रीकृष्ण या मालिकेपासून सूत्रसंचालक आजवरच्या वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. स्वप्निल जोशी हा मराठीतील दिग्गज असा अभिनेता आहे. स्वप्निल जोशी याचा जन्म 18 ऑक्टोबर 1977 रोजी झाला आहे. त्याचे वय सध्या 44 वर्ष आहे.

Team Hou De Viral