रीमा लागू यांच्या पतीला पाहिलंत का ? आहेत कलाक्षेत्रात कार्यरत

रीमा लागू यांच्या पतीला पाहिलंत का ? आहेत कलाक्षेत्रात कार्यरत

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशा काही अभिनेत्री झाल्या आहेत की, त्यांनी हिंदीसह मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील आपला मोठा दबदबा निर्माण केला होता. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत या अभिनेत्रीचे नाव होते रीमा लागू. रीमा लागू यांच्या आईने देखील चित्रपटात काम केले.

दुसऱ्या तिसऱ्या कोणासोबत नाही तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी एका चित्रपटात पत्नीची भूमिका साकारली होती. रीमा यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटात काम केले. 18 मे 2017 मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रीमा लागू यांनी साकारलेली मॉडर्न आई देखील प्रेक्षकांना खूपच आवडली.

हिंदीमध्ये त्यांनी अनेक चित्रपटात आईची भूमिका साकारली. यामध्ये सूरज बडजात्या यांच्या चित्रपटाचा विशेषकरून समावेश करावा लागेल. “मैने प्यार किया”, “हम आपके है कौन”, “हम साथ साथ है” या चित्रपटात त्यांनी साकारलेली आई प्रेक्षकांना न विसरण्यासारखी आहे. रीमा लागू यांचे आधीचे नाव नयन भडभडे असे होते.

त्यांचे शालेय शिक्षण गिरगावातील कमलाबाई शाळेमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर त्यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड असली तरी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या आईने त्यांना कला क्षेत्रापासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठवण्यात आले. मात्र, पुण्यात गेल्यानंतर त्यांच्या अभिनयाची गोडी ही अधिकच वाढली.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका बँकेत नोकरी देखील केली. मात्र, अभिनय करण्याचा गुण हा त्यांना गप्प बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी बँकेतील नोकरी देखील सोडण्याच ठेरवले. अभिनयासोबत त्यांचा प्रवास व्यावसायिक नाटक, मराठी चित्रपट हिंदी चित्रपट अशा क्षेत्रात झाला.

मैने प्यार किया, कुछ कुछ होता है, दिवाना, दिल्लगी, येस बॉस, हम साथ साथ है अशा उत्कृष्ट चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांनी साकारलेली मॉडर्न आई ही प्रेक्षकांना खूपच आवडली होती. मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेते विवेक लागू यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनीही काही वर्षांपूर्वी लग्न केले होते.

या दोघांना एक मुलगी देखील आहे. मात्र, कालांतराने या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर रिमा लागू यांनी विवेक लागू यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. विवेक लागू हे देखील अतिशय चांगल्या प्रकारचे अभिनेते आहेत. आता रिमा लागू आपल्यामध्ये नाहीत. मात्र, त्यांनी काम केलेले अनेक चित्रपट आपल्यामध्ये आजही लोकप्रिय आहेत.

त्यांच्यासारखी अभिनेत्री मराठी चित्रपट सृष्टी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीला लाभली. हे प्रेक्षकांचे भाग्यच म्हणावे लागेल.

Team Hou De Viral