Video ! ‘मन उडू उडू झालं’ च्या सेटवर ‘या’ अभिनेत्रीला फेकून मारला ग्लास, सेटवर धक्कादायक घटना

Video ! ‘मन उडू उडू झालं’ च्या सेटवर ‘या’ अभिनेत्रीला फेकून मारला ग्लास, सेटवर धक्कादायक घटना

झी मराठीवर सुरू असलेली मन उडू उडू झालं ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेमध्ये अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेमध्ये आता सानिका आणि कार्तिक यांच्या लग्नाची चर्चादेखील खूप मोठ्या प्रमाणात रंगत आहे.

आता ही बातमी देशपांडे कुटुंबा समोर आलेली आहे. त्यामुळे या घरांमध्ये आता वाद होणार हे देखील नक्की झाले आहेत. तसेच देशपांडे आणि साळगावकर कुटुंबामध्ये आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण असे पाहणार आहोत की कार्तिक हा देशपांडे यांच्या घरी फोन करतो.

त्यावेळेस देशपांडे हे त्याला आत्ताच्या आता घरी बोलावतात, तर दुसरीकडे कार्तिक हा पळून जात असतो. तेवढ्यात इंद्रा त्याला म्हणतो आणि म्हणतो की तू जबाबदारी कधी घेणार आहेस. सर्व काही करून बसलास मात्र आता जबाबदारी घेण्याची वेळ आली तर तु मागे हटत आहेस, हे योग्य नाही असे त्याला सुनावतो.

याबाबतचा नुकताच एक सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. या सीनमध्ये अतिशय मजेशीर घटना करताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये सानिकाची भूमिका ही रीना अग्रवाल हिने साकारली आहे, तर तिच्या आईची भूमिका अभिनेत्री रूपलक्ष्मी शिंदे यांनी साकारलेली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ तिने इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे.

आणि तिने या व्हिडिओला एक कॅप्शन देखील दिली आहे. या सीनमध्ये रूपलक्ष्मी यांना राग अनावर होतो आणि त्या टेबलावरील ग्लास रीना तिच्या अंगावर फेकून मारतात. हाच व्हिडिओ रीना हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर हा ग्लास चुकून लागल्याचे लक्षात येताच रूपलक्ष्मी या रिना डे धावत येतात.

हा व्हिडिओ शेअर करत रिनाने एक केप्शन देखील दिली आहे. त्यामुळे तिने असे म्हटले आहे की, आईने केली बोलिंग उडवला माझा लेग स्टँप असे स्टंप करताना धडधड होतं हार्ट पंप. आई झाली बुमराह अशी कॅप्शन तिने लिहिली आहे. हा व्हिडिओ पाहून आणि चाहत्यांनी कमेंट्स देखील केलेल्या आहेत. एका चाहत्याने अतिशय मजेशीर कमेंट केली आहे.

कमेंट केली आहे की, देशपांडे प्रीमियर लीग. डोन्ट वरी प्रॅक्टिस मेक्स मेन परफेक्ट असे म्हटले आहे.तसेच एकाच हाताने लगोरी चॅम्पियन दिसता ताई, अशी कमेंट केली आहे. या मालिकेच्या वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर केले आहे. सोशल मीडियावर या मालिकेचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

या मालिकेमध्ये अरुण नलावडे यांनी देखील जबरदस्त ही भूमिका साकारली आहे. तर ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांनी देखील या मालिकेत चांगले काम केले आहे.

Team Hou De Viral