रेखाला घरी जेवायला बोलवून जया बच्चन रेखाला असे काही बोलली होती, ज्यामुळे रेखा अमिताभ पासून दूर झाली होती!

आपल्या सर्वांनाच माहितच असेल की जया भादुरीशी लग्नानंतर अमिताभ यांच्या रेखासोबतच्या अफेअरच्या बातम्यांची खूप चर्चा झाली होती. एवढेच नव्हे तर जयाशी लग्नानंतरही अमिताभची रेखासोबतची जवळीक वाढली होती. आणि याचा परिणाम या तिघांच्या आयुष्यावरही झाला. एवढेच नाही तर, याबाबत जास्त चर्चा तर तेव्हा झाली जेव्हा ऋषि कपूरच्या लग्नात रेखाने सिंदूर लावले होते.
त्या दिवसांत अशीही बातमी आली होती की रेखा आई होणार आहे. या बातम्यांमुळे जया आणि अमिताभ यांच्या नात्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मग जयाने रेखाला घरी जेवायला बोलावले, त्यावेळी रेखाला असे वाटले की जयाला तिला घरी बोलावून तिचा अपमान करावयाचा आहे.
रेखा आवरून सावरून जयाच्या घरी पोहचली, पण रेखा तिच्या घरी पोहोचताच तिने पाहिले की जया अगदी साध्या कपड्यांमध्ये होती, या दोघांनीमध्ये संभाषण सुरू झाले, यात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे जयाने अमिताभचा उल्लेख रेखासमोर केला नाही.
जयाने रेखाला आपले घर दाखवले, बाग दाखविली आणि हे सर्व केल्या नंतर जयाने रेखाबरोबर जेवण केले आणि जेव्हा जया रेखाला दाराजवळ सोडण्यासाठी गेली आणि त्यानंतर जया तिला अशी काही बोलली जे ऐकू रेखा एकदम स्तब्ध झाली होती.
वास्तविक जया म्हणाली की काहीही झाले तरी मी अमिताभला सोडणार नाही… हे ऐकून रेखाला खूप आश्चर्य वाटले आणि ती तिच्या घरी आली. दुसर्या दिवशी त्या दोघींचे जेवणाचे किस्से बाहेर आले, पण त्या दोघांनी याबाबत गप्पच राहणे पसंद केले.