लग्नानंतर 11 महिन्यात ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीच्या नवऱ्याचे झाले होते ‘निधन’

लग्नानंतर 11 महिन्यात ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीच्या नवऱ्याचे झाले होते ‘निधन’

सत्तरच्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये एक चेहरा उदयास आला. या चेहऱ्याने सर्वांनाच वेड लावले. ही अभिनेत्री आजही तितकीच तरुण दिसते. होय आम्ही बोलत आहोत.. अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल रेखा यांचे खासगी आयुष्य खूप चर्चेत होते.

ज्याप्रमाणे त्यांनी बॉलिवूड गाजवले त्याच प्रमाणे वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक पुरुष आले. रेखा यांचा जन्म चेन्नई येथे झालेला होता. त्यांचे वडील तामिळ अभिनेते जेमिनी गणेशन होते. तसेच त्यांची आईदेखील अभिनेत्री होती. विश्वजीत हे जुन्या काळातले अभिनेते. रेखा जेव्हा पंधरा वर्षाच्या होत्या तेव्हा विश्वजीत यांनी सर्वांसमोर तिचा किस घेतला होता.

त्यानंतर ती खूप घाबरली होती. त्यानंतर या दोघात प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, पुढे काय झाले कोणालाही माहित नाही. नवीन निश्चल हे जुन्या काळातील अभिनेते होते. रेखा यांना नवीन निश्चल खूप आवडायचे. यांचे प्रेमप्रकरण देखील काही काळ झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, नवीन निश्चल यांनी रेखा यांना भाव दिला नाही, असेही सांगण्यात येते.

रेखा यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबत सर्वाधिक नाव जोडले गेले आहे. आजही अमिताभ म्हटले की समोर रेखा यांचेच नाव येते. एका लग्न समारंभामध्ये रेखा भांगेत कुंकू लावून व मंगळसूत्र घालून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अमिताभ यांच्यासाठीच कुंकू आणि मंगळसूत्र घातल्याचे सांगण्यात येते.

मात्र, रेखा यांनी आपण शूटिंगवरून इकडे अल्याचे सांगितले होते. मात्र, कुली चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांना अपघात झाला. त्यावेळी जया भादुरी यांनी अमिताभ यांची खूप काळजी घेतली. त्यामुळे अमिताभ यांनी जया भादुरी यांच्यासोबत लग्न करण्याचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रेखा या दूर निघून गेल्या.

रेखा यांनी मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र, काही वर्षातच मुकेश अग्रवाल यांनी रेखा यांच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर रेखा यांनी कधीही लग्न केले नाही. मात्र, वेगळ्या अभिनेत्यांसोबत यांचे नाव आहे. रेखा यांचे पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर याबाबत उलट सुलट बातम्या देखील प्रसार माध्यमातून समोर आले होते.

रेखा हिला माझ्या संपत्तीतून एक रुपया देखील देऊ नका, असे मुकेश अग्रवाल यांनी लिहून ठेवण्याची चर्चा देखील त्यावेळेस होती. मात्र, याबाबत अधिक खुलासा होऊ शकला नाही. एकूणच काय तर रेखा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मुकेश अग्रवाल यांनी केवळ 11 महिन्यातच आत्महत्या केली होती.

Team Hou De Viral