सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा रियाला मोठा फटका; दिग्दर्शकाने घेतला ‘हा’ निर्णय

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा रियाला मोठा फटका; दिग्दर्शकाने घेतला ‘हा’ निर्णय

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ त्यू प्रकरणाचा मोठा फटका अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या करिअरला बसला आहे. एकीकडे सुशांतच्या मृ त्यू प्रकरणी रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली असताना आता दुसरीकडे तिच्या हाती आलेले चित्रपटांचे ऑफर्ससुद्धा निसटत आहेत.

रिया चक्रवर्तीला आपल्या चित्रपटात काम देणार नाही, असा निर्णय दिग्दर्शक लोम हर्ष यांनी घेतला आहे.IANS ला दिलेल्या मुलाखतीत या निर्णयाविषयी बोलताना लोम हर्ष म्हणाले, “सुशांतच्या मृ त्यू प्रकरणी रियावर अनेक आरोप आहेत. आम्हाला सुशांतच्या चाहत्यांच्या भावना दुखवायच्या नाहीत. जनतेच्या भावनांचा आम्ही आदर करतो. त्यामुळे रियाला चित्रपटात भूमिका देणार नाही.”

गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची तयारी सुरू होती. सुरुवातीला रियाला या चित्रपटातील भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. मात्र आता लोम हर्ष यांनी रियाकडून तो चित्रपट काढून घेतला आहे.दुसरीकडे सुशांतच्या मृ त्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृ त्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.

इतर बातम्यांसाठी आत्ताच पेज लाईक करा.

Team Hou De Viral