अनिल कपूरच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल, सोशल मीडियावर चर्चेत

काही दिवसांपूर्वी अनिल कपूरची मुलगी रिया कपूरने तिचा ३४वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने तिला वडील अनिल कपूर, आई सुनिता कपूर, बहीण सोनम कपूर, चुलत बहीण अनुष्का कपूर तसेच बॉयफ्रेंड करण बुलानी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पण करणनने दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता रियाचे बॉयफ्रेंडला किस करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.अभिनेत्री सोनम कपूरची बहिण रियाने गेल्या आठवड्यात एक पार्टी आयोजित केली होती.
या पार्टीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यातील काही फोटो रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघे रोमँटीक अंदाजात दिसत आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकजण या फोटोंवर कमेंट करत आहेत.
अनिल कपूर यांची छोटी मुलगी चित्रपट निर्माती आहे. ती गेल्या १० वर्षांपासून करण बुलानीला डेट करत आहे. ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघी सतत त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.