दिसायला इतकी सुंदर असूनही अनिल कपूरने त्यांच्या दुसऱ्या मुलीला चित्रपटात काम करू दिले नाही.. कारण जाणून धक्का बसेल

कपूर खानदान म्हटले की बॉलिवूडमध्ये पृथ्वीराज कपूर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चार चांद लावले होते. त्यानंतर राज कपूर यांच्या मुलांनीदेखील बॉलीवूड गाजून सोडले होते.
राज कपूर यांचे मुले रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर यांनी देखील बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. यातील ऋषी कपूर यांचे मागेच निधन झालेले आहे. त्यांना रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर हे मुलं आहेत, तर रणधीर कपूर यांना करिष्मा कपूर आणि करिना कपूर या मुली आहेत. या दोघींनीही बॉलीवूड मध्ये मध्ये चांगले काम केले आहे.
त्यानंतर राजीव कपूर यांनी मात्र बॉलिवूडमध्ये फार यश मिळाले नाही. त्यांनी काही चित्रपटात काम केले. त्यानंतर काही चित्रपटांची निर्मिती केली. मात्र, त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. तसेच बॉलिवूडमध्ये आणखी एक कपूर खानदान आहे, त्याचे नाव आहे अनिल कपूर आणि बोनी कपूर आणि संजय कपूर. हे तिघे भावंडे आहेत. मात्र, अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर यांचा पृथ्वीराज कपूर यांच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही.
बोनी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट दिलेले आहेत. हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. मिस्टर इंडिया, लाडला यासारख्या एकाहून एक सरस चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये अनिल कपूर हा भाऊ असतोच असतो. त्यानंतर दिवंगत अभिनेत्री व बोनी कपूर यांची पत्नी श्रीदेवी हिनेदेखील अनिल कपूरसोबत अनेक चित्रपटात काम केले आहे.
अनिल आणि श्रीदेवी यांची जोडी प्रचंड चालली होती. त्यानंतर संजय कपूर याने देखील काही चित्रपटात काम केले आहे. मात्र, त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. संजय कपूर यांचा काही वर्षांपूर्वी राजा हा चित्रपट आला होता. या चित्रपटांमध्ये त्यासोबत माधुरी दीक्षित दिसली होती. या चित्रपटाने यश मिळवल होते. त्यानंतर त्याला दुसरे काही चित्रपट मिळाले नाही.
आता त्याची मुलगी शायना हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बोनी कपूर यांची मुलगी जानवी कपूर हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि यश मिळवले. त्यानंतर तिने लग्न करून संसार थाटला आहे. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा देखील बॉलिवूडमध्ये येण्यास तयार आहे. त्याचे काही चित्रपट आले.
मात्र, त्याला पाहिजे तसे यश मिळाले नाही. आज आम्ही आपल्याला अनिल कपूर यांची दुसरी मुलगी रीमा कपूरबाबत माहिती देणार आहोत. तिने अनेक बॉलीवूड चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामध्ये वेक अप सिड, वीरे दी वेडिंग, खूबसूरत यासारखे चित्रपटाचा समावेश आहे. रीमा कपूर हिने वेक अप सिद या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती.
त्यानंतर ती चित्रपट निर्मिती जास्त रमलेली आहे. याबाबत तिने बोलताना सांगितले की, या चित्रपटात काम करताना मला लक्षात आले की, आपले अभिनय हे क्षेत्र नाही. रीया कपूर फॅशन डिझायनर देखील आहे. दरम्यान, अनिल कपूर यांना असे वाटत होते की, आपली मुलगी रीया कपूर हिने बॉलिवूडमध्ये काम करू नये.
कारण एका बहिणीच्या आड दुसर्या बहिणीचे यश हे झाकाळून जाऊ शकते. त्यामुळे तिने निर्मिती क्षेत्रात यावे. असे त्यांना वाटत होते. त्यानंतर तिने तेच केलेही तसेच. ती निर्मिती क्षेत्रातच काम करत आहे. त्यामुळे तिने बॉलीवूडमध्ये चित्रपट केले नाही.