‘उरी’ मधल्या ‘त्या’ चिमुकलीत एवढा बदल, आईने केला खुलासा म्हणाली; गोळ्या आणि इंजेक्शन…

दोन ते तीन वर्षांपूर्वी उरी द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाडके कमाई केली होती. या चित्रपटाने त्यावेळेस अनेकांची वाह वाह मिळवली होती. या चित्रपटामध्ये आपल्याला विकी कौशल याची भूमिका घेतली होती.
याचबरोबर यामी गौतम हिने देखील या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये आपल्याला नरेंद्र मोदी यांच्यासारखी देखील व्यक्तिरेखा दाखवण्यात आली होती. त्याचप्रमाणे अजितकुमार डोबाल यांचे पात्र देखील या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाले होते.
या चित्रपटात अनेक कलाकारांनी भूमिका केल्या. मात्र, या चित्रपटात विकी कौशल याच्या भाचीची भूमिका साकारणाऱ्या मुलीची खूपच चर्चा झाली होती. आपल्या वडिलांना अखेरचा सलाम देताना ही मुलगी एकदमच गाजली होती. तिच्याबद्दल अनेकांना माहिती हवी असते. आज आम्ही आपल्या तिच्याबद्दलच माहिती देणार आहोत. त्या छोट्याशा मुलीचे नाव रिवा अरोरा असे आहे.
रिवा ही त्यावेळेस खूप लहान होती. मात्र, आता अचानकच तिचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच तरुण झाल्यासारखी दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. मात्र, आता रिवा हिची आई यावर चांगली संतापली आहे. तिने टीकाकारांना चोख उत्तर देखील दिले आहे.रिवा ही एकदम जवान कशी झाली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रीवा हिचे सध्याचे वय केवळ बारा वर्षे आहे. रीवा हिच्या आईने तिला हार्मोन्स चेंज च्या गोळ्या दिल्या का असा आरोप देखील आता करण्यात येत आहे. मात्र, आता तिच्या आईने याबाबत खंडन केले आहे. माझ्या मुलीच्या तरुणपणावर अनेक जण चर्चा करताना दिसत आहेत.
हे अतिशय विचित्र आहे. मी माझ्या मुलीच्या बाबतीत असा प्रकार का करेल, असा प्रश्न देखील रीवा हिच्या आईने विचारला आहे. उरी चित्रपटात अतिशय लहान दिसणारी ही मुलगी एकदमच मोठी कशी झाली, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र, आता मुलीची जात आहे, त्यामुळे ती वाढणारच असे देखील सांगितले आहे.मी तिला कुठल्याही प्रकारचे गोळ्या किंवा इंजेक्शन दिलेली नाहीत. जेणेकरून ती तरुण दिसेल. ती आता खरोखरच मोठी झाली आहे. तिचे सोशल मीडिया खाते मात्र मीच अजून चालवते,असेही त्यांनी सांगितले आहे.