मनोरंजन क्षेत्राला आणखीन एक धक्का; या प्रसिद्ध तरुण अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये अनेक दिग्गज अभिनेत्यांसह दिग्गजांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. रमेश देव हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यानंतर त्यांचे निधन झाले.
रमेश देव यांनी त्यांचा वाढदिवस नुकताच साजरा केला होता. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्याचबरोबर गानकोकिळा लता मंगेशकर यांचे देखील वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांनी आपल्या जबरदस्त आवाजाने बॉलीवूडसह 27 भाषांमध्ये गाणी गायले होते.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने तर एक दिवसाची सुटी देखील दिली होती. आता देखील दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये एका आघाडीच्या रेडिओ आर. जे. चे निधन झाले आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.
लता मंगेशकर यांच्या नंतर बॉलिवूडमधील आघाडीचे गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे देखील निधन झाले. ते मृत्युसमयी 69 वर्षांचे होते. बप्पी लहरी यांनी आजवर अनेक गीते अजरामर केलेली आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. मिथुन चक्रवर्ती याचा डिस्को डान्सर हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता.
दक्षिण चित्रपट सृष्टीमध्ये देखील गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकार आपल्याला सोडून गेलेले आहेत. दक्षिण चित्रपट सृष्टीमध्ये मोहन बाबु यांच्या जवळच्या नातेवाईकांना देखील नुकतेच निधन झाले होते. त्याचबरोबर आघाडीचा अभिनेता पुनीत राजकुमार याचे देखील निधन झाले. हृदयविकाराने निधन झाल्याचे सांगण्यात आले होते.
व्यायाम करून घरी आल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. वयाच्या 46 व्या वर्षी त्याने अंतिम श्वास घेतला होता. आतादेखील दाक्षिणात्य रेडिओमध्ये प्रसिद्ध असलेली आरजे रचना हिचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय केवळ 39 वर्षे होते.
रचना ही बेंगळुरू येथील जे. पी. नगर मध्ये राहत होती. रेडिओ मिरची रेडिओ चैनल वरील विविध कार्यक्रमांमधून ती लोकप्रिय ठरली होती. तिने अनेक प्रेक्षकांचे मन देखील जिंकून घेतले होते. अनेक बॉलीवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील कलाकारांचे तिच्याशी चांगले संबंध होते. पोरी टपोरी रचना अशी देखील या आरजे रचनाची ओळख होती.
रचना ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत होती. मात्र, असे असले तरी तिला ह्रदयविकाराचा झटका आला. खान पानांमधील बदल आणि इतर काही गोष्टींमध्ये दुर्लक्ष केल्यामुळे तिला हृदयविकार आला असावा, असे देखील अनेकांनी सांगितले आहे. तिच्या मृत्यू नंतर निरंजन देशपांडे या कलाकारासह अनेकांनी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी मधून तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
एवढ्या लहान वयात तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.