‘येऊ तशी कशी मी नांदायला’ मधील रॉकी सोबत हे काय घडलंय, पाठीवर झाल्यात मोठ्या जखमा

‘येऊ तशी कशी मी नांदायला’ मधील रॉकी सोबत हे काय घडलंय, पाठीवर झाल्यात मोठ्या जखमा

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्या तरी काही मालिका या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यामध्ये यशस्वी झालेल्या आहेत. यामध्ये अशीच एक मालिका आहे. या मालिकेचे नाव येऊ कशी तशी मी नांदायला असे आहे. या मालिकेमध्ये शकू मावशी हे पात्र प्रचंड गाजत आहे. ही भूमिका अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी केलेली आहे.

तर यामध्ये ओम आणि स्वीटू यांची प्रेम कहानी देखील चांगलीच गाजत आहे. मात्र, ओम आता सध्या घर सोडून गेलेला आहे. गेल्या काही भागांमध्ये आपण पाहिले की शकू मावशी ही गुलाब जामुन करत असते. त्याच वेळेस तिथे स्वीटू येते आणि शकू मावशीला म्हणते की, तुम्हाला ओमची आठवण येत आहे. त्याला आपण बोलून घेऊ. या त्यावर शकू मावशी असे म्हणते की, मला आठवण वगैरे काही येत नाही.

मी तुझ्यासाठी गुलाब जामून केले आहेत. त्यानंतर स्वीटू शकू मावशी यांना हॉलमध्ये घेऊन येते त्याच वेळेस रॉकी तिथे येतो आणि मग दोघेही शकू मावशी हिला ओवाळू लागतात. त्याच वेळेस मालविका देखील तिथे येते. मात्र काही न बोलता ती निघून जाते. त्यामुळे शकू मावशीला राग येतो. तर दुसरीकडे दादा याला देखील खूप वाईट वाटत असते. आपल्यामुळेच शकू मावशी व ओम यांची ताटातूट झाल्याचे त्याला वाटत असते.

त्यामुळे तो खूप नाराज असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. तर या मालिकेमध्ये रॉकी ही भूमिका ही त्रियुग मंत्री या अभिनेत्याने साकारली आहे.त्रियुग याने याआधी देखील अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे वय सध्या 44 वर्षे आहे. त्याची ही भूमिका अप्रतिम अशी झालेली आहे, तर या मालिकेमधील मालविकाचे पात्र देखील अतिशय जबरदस्त असे झाले आहे.

अभिनेत्री आदिती सारंगधर हिने ही भूमिका साकारलेली आहे. आदिती सारंगधर याआधी अनेक मालिका आणि चित्रपटात दिसली होती. ‘सावरखेड एक गाव’ हा चित्रपट आपण पाहिला असेल. या चित्रपटातील तिची अप्रतिम अशी भूमिका होती. त्याचप्रमाणे वादळवाट ही मालिका देखील प्रचंड गाजली होती. या मालिकेत तिने अफलातून असे काम केले होते.

या मालिकेमध्ये शकू मावशीच्या भूमिकेत दिसलेल्या शुभांगी गोखले यांनी देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी केदार शिंदे यांच्या श्री गंगाधर टिपरे या मालिकेत त्यांनी अफलातून अशी भूमिका केली होती. या मालिकेत रॅकीची भूमिका साकारणारा अभिनेता त्रि युग मंत्री याने नुकताच फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या पाठीवर खूप जखम झालेल्या दिसत आहेत.

मात्र त्याने यावर खुलासा करताना सांगितले आहे की, मी एक उपचार पद्धती करत आहे. यामध्ये रक्त शुद्ध होत असते. या उपचार पद्धतीचे नाव हिजामा असे आहे. त्याच्या पाठीवर लाल चट्टे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, तर आपल्याला त्रीयुग मंत्री आवडतो का? हे नक्की सांगा.

Team Hou De Viral