RRR Movie First Day Collection : RRR ची कोट्यावधींची कमाई, ‘The Kashmir Files’लाही टाकलं मागे, परदेशातही करोडोंचा गल्ला!

RRR Movie First Day Collection : RRR ची कोट्यावधींची कमाई, ‘The Kashmir Files’लाही टाकलं मागे, परदेशातही करोडोंचा गल्ला!

बॉक्स ऑफिसवर दोन वर्षानंतर आता कुठे चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली आहे. साधारणत दोन ते तीन महिन्या आधी सरकारने चित्रपटांना चित्रपट गृहात दाखवण्याची निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून अनेक निर्माता, दिग्दर्शकांचे खूप नुकसान झाले होते.

मात्र आता अनेक नविन चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर येताना दिसत आहे. त्यामुळे कोट्यावधींची उड्डाणे चित्रपट हे घेताना दिसत आहेत. आता देखील एस. एस. राजमौली यांचा आर. आर. आर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

काही दिवसापूर्वी द कश्मीर फाइल्स हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटांमध्ये पल्लवी जोशी, अनुपम खेर यांच्यासह दिग्गज या अभिनेत्याच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने अल्पावधीतच दोनशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. कश्मीरी पंडित यांच्यावर आधारित असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला आहे.

आतादेखील एस. एस. राजमौली यांचा आर आर आर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये रामचरण, ज्युनिअर एनटीआर यांच्या भूमिका आहेत. तसेच या चित्रपटांमध्ये अजय देवगन याने देखील विशेष भूमिका साकारली आहे. हा चित्रपट एकाच वेळेस भारतासह परदेशात देखील प्रदर्शित झाला आहे.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, लंडन या देशांमध्येही या चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे. रजामौली यांनी याआधी अनेक जबरदस्त चित्रपट बनवले आहेत. राजमौली यांच्या नावावर बाहुबली, बाहुबली द बिगिनिंग हे चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये आपल्याला प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया या सारखे अभिनेते दिसले आहेत.

आता राजमौली यांचा आर आर हा चित्रपट प्रचंड धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याबरोबर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 18 कोटी रुपयांचा गल्ला कमावला होता, तर आता या चित्रपटाने जगभरामध्ये बंपर कमाई करून सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका, कॅनडा, युएस सारख्या देशांमध्ये चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे.

या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास दक्षिणेत शंभर कोटीहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट 200 कोटीचा आकडा लवकरच पार करेल, असे देखील सांगण्यात येत आहे. बाहुबली नंतर राजमौली यांचा हा सर्वाधिक हिट चित्रपट आहे.

Team Hou De Viral