या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लवकरच होणार आई, जाणून घ्या कोण आहे ती

या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लवकरच होणार आई, जाणून घ्या कोण आहे ती

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या अनेक कलाकार हे आई-वडील होण्याच्या जवळपास आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कराडे याने देखील आपल्याला दोन मुली झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्याच्या या पोस्टला अनेकांनी लाईक आणि शेअर केले होते. याच प्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकार हे लग्न बंधनात अडकलेले आहेत.

तर काही अभिनेत्री आता लवकरच आई होणार आहेत. तर काही कलाकारांनी गेल्या वर्षभरात लग्न देखील केलेले आहे. त्यामध्ये आपल्याला सोनाली कुलकर्णीचे नाव घेता येईल. सोनाली कुलकर्णी हिने काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे. ती मालदीव येथे आपला हनिमून साजरा करण्यासाठी गेली होती. आपल्या पतीसोबत चे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

त्याचप्रमाणे ती जिथे राहत आहे, त्या महागड्या रिसॉर्टचे देखील फोटो पोस्ट केले होते. मराठी चित्रपटसृष्टीत संकर्षण कराडे हा अतिशय लोकप्रिय असा अभिनेता आहे. तो सध्या माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेमध्ये दिसत आहे या मालिकेत त्याच्यासोबत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे हे दिसताहेत. तो मराठवाड्याचा परभणी जिल्ह्यातला रहिवासी आहे.

असे असले तरी त्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याने आपल्याला दोन मुली झाल्या असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्याने मुलीचे नाव देखील सांगितले होते. आज आम्ही आपल्याला एका मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल माहिती सांगणार आहोत. तसेच तिचा पती देखील अभिनेता आहे. या अभिनेत्रीचे नाव रुची सवर्ण असे आहे.

ती अतिशय गोंडस अशी अभिनेत्री आहे. रूची हिने याआधी अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केलेले आहे. रुची हिने “सख्या रे” या मालिकेत काम केले आहे. तिची ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.याच बरोबर तिने हिंदी मालिकेतेही काम केले आहे. तिने काम केलेली तमन्ना ही मालिका प्रचंड गाजली होती. याच बरोबर कुमकुम भाग्य ही मालिका प्रेक्षकांना आवडली होती.

तसेच घर आजा परदेसी ही मालिकाही तिची लोकप्रिय ठरली होती. रुची हिच्या प्रमाणे तिचा नवरा अंकित मोहन हा देखील अभिनेता आहे. त्याने देखील अनेक मराठी चित्रपटात काम केलेले आहे. त्याने काम केले फर्जंद आणि फत्तेशिकस्त हे चित्रपट प्रचंड चालले होते. काही दिवसापूर्वी नुकतीच एक गुड न्यूज दिली आहे. मी आणि अंकित आई-बाबा होणार असे तिने सांगितले होते.

या नंतर सोशल मीडियावर देखील तिने याबाबत पोस्ट टाकली होती तिच्या चाहत्यांनी या दोघांना शुभेच्छा दिले आहेत.

Team Hou De Viral