‘बिगबॉस मराठी 4’ मधल्या रुचिरा जाधव ला आवडते ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या काय आहे ते

‘बिगबॉस मराठी 4’ मधल्या रुचिरा जाधव ला आवडते ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या काय आहे ते

कलर्स मराठी वर सुरू झालेला बिग बॉस हा शो गेल्या काही दिवसापासून आता लोकप्रिय होताना दिसत आहे. 2 ऑक्टोबरपासून हा सुरू झाला असून या शोची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. मात्र, या शोमध्ये यंदाच्या सत्रात काही खास कलाकार सहभागी झालेले नाहीत.

त्यामुळे या शोला टीआरपी जास्त मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच बिग बॉस 4 लवकर संपवण्यात येते की, काय अशी शक्यता देखील आता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या शोमध्ये वेगवेगळे टास्क देण्यात येतात. या टास्क प्रमाणे सर्वांना खेळावे लागते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धा देखील घेण्यात येतात.

त्याचप्रमाणे अनेक कलाकार मोकळ्या वेळेत आपल्या कलागुणांना वाव देणारे प्रसंग देखील करतात. त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्या कला अवगत आहेत, त्याबद्दल देखील चर्चा करताना दिसतात. आता देखील सहभागी झालेल्या रुचीराला येत असलेल्या कलागुणांबद्दल ती चर्चा करताना दिसत आहे.

बिग बॉस या शोमध्ये रुचिरा आणि इतर दोघेजण गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यात रूचिरा म्हणते की, मला पेंटिंग करायला खूप आवडते. स्वामींच नाव घ्यायचा आणि सुरू करायचं. मी स्वामींचे पण स्केच काढले होतो. मी तुला घरा बाहेर आल्यावर ते दाखवेन, असे ती दुसऱ्या स्पर्धकाला म्हणताना दिसत आहे. पुढे ती म्हणताना दिसत आहे की, मी जेव्हा वाटेल तेव्हा असे स्केच काढते.

मला त्यावेळेस ते काढावे वाटले, म्हणून मी स्वामीजी स्केच काढले होते. तसेच काजळने कृष्णाचा स्केच बनवल्याचे ती सांगत आहे. तर दुसरा स्पर्धक दुसरी अभिनेत्री रुचीरा हिला सांगताना दिसत आहे की, मला पेंटिंग बनवता येत नाही. मात्र, मला ते पाहायला आवडतं. शाळेत एलिमेंट्री परीक्षा मी पाहिलेली आहे. मात्र, त्यामध्ये कधी सहभागी झाले नाही. मी शाळेत असताना एका पेपरवर एक डॉट टाकायचा आणि फु करायचं.

हे करत असताना मला चक्कर आली होती की, विचारू नका. त्यानंतर मला घरी नेण्यात आले. पुढे रुचिरा बोलताना दिसत आहे की, जर दिवाळीला मी मातीच्या पणत्या आणते आणि नंतर ते कलर करत बसते. तर बिग बॉसचा हा संवाद पाहून अनेक जण चकित झाले आहेत, तर अनेकांनी यावर आपले मत देखील व्यक्त केली आहे.

Team Hou De Viral