दुःखद ! शूटिंग दरम्यान 20 फूट उंचीवरून पडून ‘या’ प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

दुःखद ! शूटिंग दरम्यान 20 फूट उंचीवरून पडून ‘या’ प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना अनेकदा अभिनेते हे डमीमॅन वापरत असतात. हे डमीमॅन अभिनेत्यांना खरे रूप देऊन आपले जीवन धोकादायक पद्धतीने स्टंट करून धोक्यात घालत असतात. अनेक स्टंट मॅन हे अशा पद्धतीने चित्रीकरण करतात आणि पडद्यावर पाहताना आपल्याला वाटते की, अभिनेताच हा स्टंट करत आहे.

मात्र वास्तविकरीत्या स्टंटमॅन असे सीन करत असतो. यादरम्यान अनेक स्टंट मॅन यांना दुखापत देखील होते, तर काही जणांचा जीव देखील जातो. आता देखील अशीच घटना दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये घडलेली आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरण दरम्यान ही घटना घडली आहे. या कलाकाराचे वीस फूट उंचीवरून खाली पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये आघाडीचा कलाकार असलेला विजय सेतुपती याच्या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू होते. विजय सेतुपती याचा वेदू थलाई या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात दरम्यानच 54 वर्षीय स्टंट मास्टर एस. सुरेश हे वीस फूट उंचीवरून खाली कोसळले. सुरेश हे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम करत होते.

ते अनेक वर्षापासून दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश यांना एका क्रेनच्या सहाय्याने दोरीने बांधण्यात आले होते. ही उंची तब्बल वीस फूट अशी होती. मात्र, शूटिंग जसे सुरू झाले तसे ही दोरी तुटली आणि सुरेश हे वीस फूट उंचीवरून खाली पडले त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत्यू घोषित केले. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी मध्ये एकच हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच आता सुरेश यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त झाली असतानाच अनेक चाहत्यांनी देखील संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील केली आहे. अतिशय निष्काळजीपणे हे चित्रीकरण करण्यात आले आहे, असे देखील अनेकांनी म्हटले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सुरेश गेल्या वीस वर्षापासून दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम करून आपल्या कलेची जादू दाखवली आहे. एकूणच आता ही दुर्घटना घडल्यामुळे या चित्रपटाची चित्रीकरण काही दिवसासाठी बंद झाले आहे.

Team Hou De Viral