संगीत विश्वाला धक्का ! प्रसिद्ध गायकाचे झाले दुःखद निधन

संगीत विश्वाला धक्का ! प्रसिद्ध गायकाचे झाले दुःखद निधन

मनोरंजन विश्वाला सध्या काय झाले माहित नाही. एका मागून एक कलाकार आपल्याला सोडून जाताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी बॉलीवूडचे अभिनेते ज्येष्ठ कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. व्यायाम करत असताना ते घसरून पडले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस त्यांनी मृत्यूची झुंज दिली. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात अनेक कलाकार देखील आपल्याला सोडून गेल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचा आघाडीचा गायक केके याचा देखील असाच अपघाती मृत्यू झाला. असेच म्हणावे लागेल.

कारण त्याला एका कार्यक्रमात दरम्यानच त्रास होऊ लागला होता आणि त्यानंतर त्याला हृदय विकाराचा झटका आला. आणि त्याचे निधन झाले. त्याआधी देखील अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. आता देखील एका कलाकाराचे निधन झाले आहे. या कलाकाराने अनेक मालिका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबरोबरच रेडिओसाठी देखील खूप काम केले होते.

या कलाकाराचे नाव एस व्ही रामानन असे होते. वयोमानुसार त्यांचे निधन झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांना नेमकी काय झाले होते याबद्दल माहिती मिळाली नाही. एस व्ही रामानन हे टेलिव्हिजन आणि रेडिओ जगतामधले खूप मोठे नाव होते. त्यांनी अनेक शो हे अतिशय धडाडीने केले होते. त्यांच्या आवाजाची जादू आजही जाणवते. व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रोजेक्ट तडीस नेले होते.

अनेक जाहिरातींना त्यांनी आपला आवाज दिला होता. त्यांचा आवाज आजही प्रेक्षकांच्या कानात असतो. मात्र, हा आवाज नेमका कोणाचा आहे आणि त्यांना माहिती नसते, तर तो आवाज त्यांचाच होता. याशिवाय त्यांनी लोकप्रिय रेडिओसाठी देखील आपला आवाज दिला आहे. त्यानंतर त्यांनी आवाज दिलेल्या जाहिराती देखील प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या.

आघाडीचे संगीतकार रविचंद्र यांचे ते आजोबा आहेत. त्यांनी अनेक मालिका चित्रपटाचे दिग्दर्शन संगीतकार म्हणून देखील काम केले आहे, तर त्यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली.

Team Hou De Viral