सचिन पिळगांवकर यांच्या बहिणीला पाहिलंत का ?

सचिन पिळगांवकर यांच्या बहिणीला पाहिलंत का ?

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये सचिन पिळगावकर हे एक दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. अनेक चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील त्यांनी केले आहे. सुप्रिया पिळगावकर ही सचिन पिळगावकर यांची पत्नी. या दोघांनी आजवर अनेक चित्रपट व मालिका एकत्र काम केलेले आहे.

सचिन पिळगावकर यांनी मराठीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती तर केलीच आहे. मात्र, या चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केलेला आहे. त्यांच्या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर या हमखास अस तात. या पती-पत्नीची जोडी अनेक चित्रपटात आपण पाहिलेली आहे. नवरा माझा नवसाचा, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा यासारख्या आणि इतर चित्रपटात या जोडीने धमाल उडवून दिली आहे.

काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवर देखील सुप्रिया पिळगावकर यांनी धमाल उडवून दिली होती. तू तू मे मे या मालिकेत त्यांनी काम केले होते. ही मालिका प्रचंड चालली होती. या मालिकेत रीमा लागू यांनी देखील भूमिका केली होती. ही मालिका एवढी गाजली होती की या मालिकेसाठी अनेक मालिकांचे टाईम बदलण्यात आले होते.

त्यानंतरही सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी रियालिटी शोमध्ये देखील काम केले होते.एका डान्स शोमध्ये ही जोडी जिंकली होती. सचिन पिळगावकर गेल्या साठ वर्षापासून बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवत आहेत. सचिन पिळगावकर यांनी बालपणापासूनच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांना लहानपणीच चित्रपट मिळाले होते.

सचिन पिळगांवकर यांची शोले या चित्रपटातील छोटी भूमिका अतिशय लक्षवेधी ठरली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या इतर भूमिका ही लक्षवेधी ठरलेल्या होत्या. आता मराठीतील ते दिग्गज असे दिग्दर्शक निर्माता व अभिनेते आहेत. सचिन पिळगावकर यांना एक बहीण देखील आहे. सचिन यांच्या बहिणीचे नाव तृप्ती पिळगावकर असे आहे. सचिन यांनी नुकताच आपल्या बहिणीचा एक फोटो वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा फोटो लहानपणीचा आहे. या फोटोवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन पिळगावकर यांची बहीण देखील त्यांच्या सारखीच दिसायला खूप सुंदर अशी आहे, तर आपल्याला सचिन पिळगावकर यांची बहीण कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral