‘माझी पहिली आई…’, सचिन पिळगावकर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘माझी पहिली आई…’, सचिन पिळगावकर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

सचिन पिळगावकर मराठीसह हिंदी मध्ये नावाजलेले नाव. सचिन पिळगावकर यांनी आजवर हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपट केले. त्याचप्रमाणे चित्रपट सृष्टीतील त्यांची कारकीर्द ही अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोठी आहे, असे म्हटले जाते. कारण सचिन यांनी बाल वयापासूनच आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती.

सचिन यांना जवळपास 50 वर्ष चित्रपट सृष्टीमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. सचिन यांच्यावर आता दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या चित्रपटातील पहिल्या आई या जग सोडून गेल्या आहेत. तर नेमके काय प्रकरण नाही जाणून घेऊया.

सचिन पिळगावकर यांनी मराठीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती तर केलीच आहे. मात्र, या चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केलेला आहे. त्यांच्या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर या हमखास असतात. या पती-पत्नीची जोडी अनेक चित्रपटात आपण पाहिलेली आहे. नवरा माझा नवसाचा, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा यासारख्या आणि इतर चित्रपटात या जोडीने धमाल उडवून दिली आहे.

काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवर देखील सुप्रिया पिळगावकर यांनी धमाल उडवून दिली होती. तू तू मे मे या मालिकेत त्यांनी काम केले होते. ही मालिका प्रचंड चालली होती. या मालिकेत रीमा लागू यांनी देखील भूमिका केली होती. ही मालिका एवढी गाजली होती की या मालिकेसाठी अनेक मालिकांचे टाईम बदलण्यात आले होते.

त्यानंतरही सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी रियालिटी शोमध्ये देखील काम केले होते.एका डान्स शोमध्ये ही जोडी जिंकली होती. सचिन पिळगावकर गेल्या साठ वर्षापासून बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवत आहेत. सचिन पिळगावकर यांनी बालपणापासूनच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांना लहानपणीच चित्रपट मिळाले होते.

सचिन पिळगांवकर यांची शोले या चित्रपटातील छोटी भूमिका अतिशय लक्षवेधी ठरली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या इतर भूमिका ही लक्षवेधी ठरलेल्या होत्या. आता मराठीतील ते दिग्गज असे दिग्दर्शक निर्माता व अभिनेते आहेत. काही दिवसापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री तबसूम यांचे निधन झाले आहे. तबसूम यांनी चित्रपटासह सूत्रसंचालन देखील मोठ्या चांगल्या पद्धतीने केले आहे.

सचिन पिळगावकर यांनी तबसूम यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सचिन पिळगावकर म्हणतात की, माझ्या चित्रपट सृष्टीतील पहिल्या आई या सोडून गेलेल्या आहेत. मला खूप दुःख झाले आहे. कारण मी बालकलाकार म्हणून ज्या चित्रपटात काम केले त्या चित्रपटात तबसूम या माझ्या आई झाल्या होत्या.

अशा प्रकारे माझ्या पहिल्या आई मला सोडून गेल्या आहेत. त्यामुळे खूप दुःख झाले आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता, असे त्यांनी म्हटले आहे.

Team Hou De Viral