मराठमोळे अभिनेते ‘सचिन पिळगावकर’ यांनी दिली मोठी ‘गुडन्यूज’

मराठमोळे अभिनेते ‘सचिन पिळगावकर’ यांनी दिली मोठी ‘गुडन्यूज’

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. या दोघांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये भले मोठे योगदान दिले आहे. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.

सचिन पिळगावकर यांनी आजवर अनेकांचे करिअर देखील घडविले आहे. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी ही प्रेक्षकांच्या अतिशय आवडीचे अशी जोडी होती. या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र, या तिघांचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

त्यानंतर या तिघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. आता सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रेया पिळगावकर ही देखील लोकप्रिय अशा अभिनेत्री बनली आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, तिला फारसे यश मिळाले नाही. मात्र, आता ती एका फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली होती.

त्यानंतर सचिन पिळगावकर हे देखील नाराज झाल्याची बातमी तेव्हा सगळ्यांसमोर आली होती. सचिन पिळगावकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक चित्रपट दिले आहेत. यामध्ये त्यांचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. हा एक आजारामर चित्रपट म्हणावा लागेल. सचिन पिळगावकर यांनी काही नाटकात देखील काम केले.

तसेच अनेक वर्ष मराठी चित्रपट सृष्टी मध्ये एकत्र राहून महेश कोठारे यांच्यासोबत देखील काम करण्याची संधी त्यांनी अलीकडच्या काळात साधून घेतली. या दोघांनी एक चित्रपट केला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला होता. मात्र, या चित्रपटाची चर्चा झाली होती.

आता सचिन पिळगावकर यांच्या बाबतीत एक बातमी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. सचिन पिळगावकर यांना एक पुरस्कार जाहीर झाला आहे. होय आपण जे ऐकले ते खरे आहे. सचिन पिळगावकर हे गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत आहेत.

त्यांचे हेच योगदान लक्षात घेऊन गांधार या संस्थेतर्फे सचिन पिळगावकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गडकरी रंगायतन येथे सकाळी 11 वाजता हा पुरस्कार देण्यात येणारे असल्याचे सांगण्यात येते आहे. सचिन यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तर आपल्याला सचिन पिळगावकर आवडतात का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral