‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील जयदीप गौरीची ‘लक्ष्मी’ आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी

स्टार प्रवाह वाहिनीवर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका लोकप्रिय बनत चालली आहे, तर काही प्रेक्षक या मालिकेवर टीका देखील करताना दिसत आहेत.या मालिकेमध्ये जयदीप गौरीच्या आयुष्यामध्ये आता मुलीची एन्ट्री झाली आहे. ही मुलगी म्हणजे लक्ष्मी होय.
लक्ष्मीची भूमिका बालकलाकार साईशा साळवी ही साकरते आहे.साईशा साळवी हिने आधी देखील अनेक मालिकांमध्ये देखील काम करून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.आता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेमध्ये देखील ती चांगलीच काम करत आहे. साईशा हिच्या आई वडिलांविषयी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.
साईशा साळवी ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अनेक आपले व्हिडिओ ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिच्या व्हिडिओला देखील प्रेक्षक प्रचंड लाईक करत असतात. आता तिला थेट मालिकेत एन्ट्री भेटली आहे. त्यामुळे तिचा मालिकेचा मार्ग सुकर झाला आहे. आता ती देखील मायरा वायकूळ प्रमाणे धूम धडाका करणार हे मात्र नक्की आहे.
साईशा पिंकीचा विजय असो या मालिकेत ती झळकली होती. साईशा हिने पिंकीचा विजय असो मालिकेत ओवीची भूमिका साकारली असून अभिनेता पीयूष रानडेसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो असून अनेकांनी तिला पसंती दिली आहे. आता साईशा साळवी हिच्या बाबतीतली एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
याचे कारण म्हणजे साईशा साळवी हिच्या कुटुंबीयाविषयी माहिती देणारी ही बातमी आहे. साईशा साळवी हिच्या आईचे नाव श्वेता साळवी असे आहे. श्वेता या देखील तिच्याप्रमाणेच खूपच सुंदर आहेत. त्या देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या मुलीबद्दल अनेकदा माहिती देत असतात. तर साईशाच्या वडिलांचे महाबळेश्वर येथे एक मोठ हॉटेल आहे. तिच्या वडिलांचे नाव हेमंत साळवी असे आहे.
ते एक हॉटेल व्यावसायिक आहेत आणि ते खूप मोठा व्यवसाय देखील करत असतात. तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये साईशा सकारात असलेली लक्ष्मीची भूमिका आपल्याला आवडते का ?आम्हाला नक्की सांगा.