सलमान सोबतच्या चित्रपटातुन रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री पहा आता कशी दिसते, योगा टिचरशी केला आहे विवाह

सलमान सोबतच्या चित्रपटातुन रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री पहा आता कशी दिसते, योगा टिचरशी केला आहे विवाह

चित्रपट ‘तेरे नाम’ ची निर्जरा म्हणजे भूमिका चावलाचा अभिनय तुम्हाला आठवत असेलच. ‘तेरे नाम’ या चित्रपटातून भूमिकाने सलमान खानबरोबर डेब्यू केला होता. हा चित्रपट जबरदस्त हिट झाला होता.चला तर आज तिच्याबद्दल जाणून घेऊया.

पहिल्यावहिल्या हिट चित्रपटात भूमिका करणारी भूमिका चावला आज रुपेरी पडद्यावरुन जणू गायबच झाली आहे. आता भूमिका विवाहित असून सेटल झाली आहे. भूमिका नुकतीच मुंबईतील एका थिएटरच्या बाहेर दिसली. भूमिका तिच्या 5 वर्षाच्या मुलासमवेत दिसली होती. यावेळी तिने ब्लॅक टॉप आणि जीन्स परिधान केलेली होती.

41 वर्षीय या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. भूमिकाने हिंदीमध्येच नव्हे तर तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांमध्येही बरीच कामे केली आहेत.पंजाबी कुटुंबात जन्मलेली भूमिका हिचा पहिला चित्रपट Yuvakudu हा होता. हा एक तेलुगु चित्रपट होता.

भूमिकाला 2001 च्या ‘कुशी’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. भूमिका लवकरच दक्षिणच्या चित्रपटांमधले एक सुप्रसिद्ध नाव बनले होते. त्यानंतर तिला ‘तेरे नाम’ चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली.

‘तेरे नाम’ हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. सलमानच्या कामाबरोबरच भूमिकेच्या अभिनयाचे ही प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केले. यानंतर, भूमिकाला बऱ्याच हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या. 2004 मध्ये, भूमिकेने अभिषेक बच्चनच्या आलेल्या ‘रन’ चित्रपटातही काम केले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही.

या चित्रपटाच्या नंतर भूमिकाला सलमानबरोबर पुन्हा ‘सिलिसिले’ आणि ‘दिल जो भी कहें’ सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण दोन्ही चित्रपट वाईट पद्धतीने फ्लॉप झाले. बॉलिवूडमध्ये फ्लॉप झालेले चित्रपट पाहिल्यानंतर भूमिकाने पुन्हा तेलगू चित्रपटांकडे आपले मन वळवले. तिथे तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले जे खूप हिट ठरले.

2006 साली आलेल्या भूमिकाच्या Sillunu Oru Kaadhal ने तर चित्रपट सृष्टीत तर मोठा दबदबा निर्माण केला. दरम्यान, भूमिकाने पंजाबी व अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले. जिथे तिला मोठे यश मिळाले. पण कदाचित तिच्यासाठी बॉलिवूड बनलेलाच नव्हता. मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम करूनही भूमिकाची जादू काय बॉलिवूड मध्ये चालली नाही.

व्यावसायिक जीवनाव्यतिरिक्त, आम्ही आपणस भूमिकेच्या वैयक्तिक जीवनाबद्दल देखील माहिती देतो. चित्रपटात येण्यापूर्वी भूमिका योगा शिकत होती. भरत ठाकूर हे तिचे योगा प्रशिक्षक होते. योगा शिकत असताना भूमिका त्या प्रशिक्षकाच्या प्रेमात पडली. जवळजवळ 4 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, भूमिकाने भरतशी लग्न केले.

भूमिका आणि भरत यांचे लग्न नाशिकच्या देवलानी येथील एका गुरुद्वारामध्ये झाले होते. 2007 मध्ये तिने लग्न केले भूमिकाला एक मुलगा आहे. चित्रपटसृष्टीचा बॅकग्राउंड नसलेल्या माणसाशी लग्न केलेली भूमिका आज तिच्या विवाहित जीवनाचा आनंद लुटत आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral