सलमान खानने केला नको तो ‘घाणेरडा’ प्रकार; विडिओ पाहून चाहते भडकले

सलमान खानने केला नको तो ‘घाणेरडा’ प्रकार; विडिओ पाहून चाहते भडकले

सलमान खान हा बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आहे. सलमान खान लवकरच एका नव्या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट म्हणजे याचा टायगर थ्री आहे. टायगर थ्री मध्ये तो कटरीना कैफ सोबत दिसणार आहे.

मात्र, सलमान खान आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे सलमान खान हा सध्या ‘दा-बॅंग द टूर रीलोडेड’ या टूरवर गेलेला आहे. दुबईमध्ये हा शो सध्या धूम धडाक्यात सुरू आहे. सलमान खान याच्या सोबतच पूजा हेगडे, दिशा पाटणी, सोनाक्षी सिन्हा आणि आणखीन काही कलाकारांचा भरणा या टूरमध्ये असल्याचे सांगण्यात येते.

काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ आणि फोटो देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर सलमानने आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली होती. सोनाक्षी सिन्हा सोबतचा देखील त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये सलमान खान याने लग्न केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, ही फेक न्युज असल्याचे समजते.

सलमान खान हा आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि कृतींनी खूप चर्चेत असतो. सलमान खान यांचे वैयक्तिक आयुष्य हे कायमच वादात राहिलेले आहे. त्याचप्रमाणे ड्रंक अँड ड्राइव्ह, काळवीट शिकार प्रकरण आणि इतर प्रकरणांत देखील त्याला दोषी धरले होते. काही प्रकरणात त्याची मुक्तता झाली, तर काही प्रकरणे अजूनही सुरू आहेत.

त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी त्याने एका व्यक्तीला आणि पत्रकार यालादेखील बेदम मारहाण केली होती. त्याचप्रमाणे रस्त्यावर झोपलेल्या काही लोकांना त्याने चिरडले देखील होते. सलमान खान हा लॉकडाउनच्या काळामध्ये आपल्या फार्महाऊसवर होता. या ठिकाणी त्याला एका विषारी सापाने चावल्याची बातमी देखील मध्यंतरी आली होती.

मात्र, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांची प्रकृती धोक्याबाहेर गेली. फार्महाऊसवर सलमान आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यामध्ये देखील काहीतरी शिजत असल्याचे बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. मात्र, एका गाण्याच्या शूटिंगसाठी हे दोघेही तिकडे गेले होते, असे सांगण्यात येत आहे. आता सलमान खान याचा दुबई टूर वरून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये त्याने पूजा हेगडेच्या ड्रेसला तोंडात पकडले आहे. जुम्मे की रात है या गाण्यावर सगळे कलाकार हे नृत्य करत होते. मात्र यावेळेस पूजा हेगडे ही तोकड्या कपड्यांमधे नाचताना सलमानने तिचा ड्रेस आपल्या तोंडात पकडला. त्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी आणि इतरांनी त्याला चांगलेच धारेवर धरले.

एखाद्या महिलेचा अशाप्रकारे आपमान करणे, योग्य नाही, असे देखील त्यांनी म्हटले आहे, तर सलमान खान याने कुठल्या कारणाने पूजाचा ड्रेस आपल्या तोंडात धरला आहे, हे काही कळू शकले नाही. मात्र, गाण्यावर ती व्यवस्थित नाचत नव्हती, असे सांगण्यात येत आहे. सलमान आणि पूजा ‘कभी ईद कभी दीवाली’ या चिञपटात एकत्र दिसणार आहे.

हा चिञपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून या दोघांनाही अपेक्षा आहेत.

Team Hou De Viral