सलमान खानवर का केला जातोय टीकेचा भडीमार? काय आहे सलमान आणि सुशांतच मॅटर, जाणून घ्या

सलमान खानवर का केला जातोय टीकेचा भडीमार? काय आहे सलमान आणि सुशांतच मॅटर, जाणून घ्या

मित्रांनो अभिनेता सुशांतसिंग राजपूतने काही दिवसांपूर्वी मुंबईमधील राहत्या घरी वयाच्या 34 व्या वर्षी जीवनप्रवास संपवला. अत्यंत कमी कालावधीमध्ये तो यशाच्या शिखरावर पोहोचला होता. यश, पैसे, प्रसिद्धी असतानादेखील सुशांतने आपले जीवन का संपवले, याचे गूढ त्याच्या चाहत्यांना उकलत नाहीये. सुशांतच्या आ त्म ह त्ये मागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

कधी त्याची आधीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेशी या गोष्टींचा संबंध लावला जात आहे तर सिनेइंडस्ट्रीतील प्रस्थापितांनी डावलल्यामुळे सुशांतने नै राश्यातून आ त्म ह त्या केली असंही काहींचं म्हणणं आहे. याचाच एक भाग म्हणून बॉलिवूडमध्ये चांगले वजन असलेला अभिनेता सलमान खाननेदेखील सुशांतवर प्रतिबंध लावला होता अशा चर्चा आहेत. आजच्या लेखात आपण या अनुषंगाने माहिती जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडमधील एका मोठ्या जाणकार व्यक्तीने केलेले याविषयीचे ट्विट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ट्विटमध्ये अभिनेता सुशांत सिंगवर करण जोहर, सलमान खान, YRF, टी-सीरिजसारख्या मोठ्या चित्रपट निर्मात्यांनी अप्रत्यक्षरीत्या बहिष्कार टाकला होता. यामुळे सुशांतला एकही मोठ्या बॅनरखालचा चित्रपट करायला न मिळाल्यामुळे तो नै राश्यात होता असं सांगितलं जात आहे.

मागे एका चाहत्याच्या प्रश्नाला सुशांतने इंस्टाग्रामवरून दिलेली प्रतिक्रियादेखील आता चर्चेचा विषय होत आहे. यामध्ये सुशांत म्हणतो कि फिल्म इंडस्ट्रीत तो आज ज्या स्थानावर पोहोचला त्यासाठी त्याचा कुणीही गॉडफादर नाहीये.

‘मी रसिकप्रेक्षकांच्या प्रेमामुळेच इथपर्यंत येऊ शकलो. त्यामुळे तुम्हीच माझे गॉडफादर आहेत’, असेही सुशांत चाहत्याला म्हणाला होता.

वरील दोन्ही गोष्टींचा विचार केला तर सुशांतच्या अंगी सिनेइंडस्ट्रीमध्ये लागणारे सर्व गुण होते. मात्र बॉलिवूडमधील प्रस्थापित मोठे निर्माते त्याला डावलत होते असं लक्षात येईल. सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘ड्राइव्ह’देखील वितरक न मिळाल्यामुळे ऑनलाईन रिलीज करावा लागला होता.

या सर्व गोष्टींमुळे सुशांतने नै राश्यातून टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही आ त्म ह त्या नसून बॉलिवूडमधील दबावतंत्रामुळे झालेली अप्रत्यक्ष हत्याच आहे असंही अनेक जाणकार सांगत आहेत.

आमच्या इतर बातम्या –

डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – सुशांतला या गोष्टीचा होता पश्चा ताप, म्हणून त्याने…

Video; या अभिनेत्रीचा अजब दावा, म्हणते सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे.

Team Hou De Viral