ही प्रसिद्ध अभिनेत्री गंभीर आजाराने ग्रस्त, प्रकृती चिंताजनक

ही प्रसिद्ध अभिनेत्री गंभीर आजाराने ग्रस्त, प्रकृती चिंताजनक

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही जोडी लोकप्रिय ठरली होती. मात्र, अल्पावधीतच या जोडीने घटस्फोट घेतला. काही महिन्यांपूर्वी समंथा हिने नागापासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या दोघांचे चहाते देखील हळहळले होते.

मात्र, जिथे नातेसंबंध व्यवस्थितरीत्या टिकत नाहीत. तिथे एकत्र राहण्याचा काय फायदा असे म्हणत या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यानंतर समंथा लगेचच गेल्या वर्षी एका दिवाळीच्या पार्टीमध्ये पोहोचली होती. ही पार्टी एका अभिनेत्याने आयोजित केली होती. दक्षिणात्य चित्रपटसृष्टी मधील आघाडीचा अभिनेता रामचरण याने‌ ही पार्टी दिली होती.

दिवाळीच्या या पार्टीमध्ये दक्षिणेतील चित्रपटसृष्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी देखील सहभागी झाले होते. यामध्ये समंथा रुथ प्रभू ही देखील सहभागी झाली होती. या वेळी तिने अनेक जणांसोबत फोटो देखील काढले. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. या पार्टीमध्ये ती खूप मजा करताना दिसली.

तिच्याकडे पाहून असे वाटत होते की, तिच्या आयुष्यामध्ये यापूर्वी काही झालेच नाही. तिच्या चेहर्‍यावर असे काही हावभाव देखील दिसत नव्हते. विशेष‌ म्हणजे रामचरण याची पत्नी उपासना हिनेच सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते. आता समंथांच्या बाबतीतली एक बातमी नुकती समोर आली असून तिला गंभीर आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे.

याबाबत कळताच प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी देखील तिला काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच काही मदत लागली तर सांगावे, असेही म्हटले आहे. मायोसिटिस ऑटोइम्यून कंडीशन या आजाराने समंथा हिला ग्रासले आहे. काही दिवसापूर्वी तिने सोशल मीडियावर आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. आणि वरील आजार आपल्याला झाला असल्याचे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे ती टीव्ही पाहत एक ट्रेलर पहात बसली आहे. तिच्या हाताला सलाईन लावलेले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती लवकरच आता बरी होईल. हा आजार नेमका काय असतो, याबद्दल काही माहिती मिळाली नाही मात्र, तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन ती मानसिकरित्या देखील तंदुरुस्त होईल, असे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे.

तर समंथा हिला हा आजार झाल्याने अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे आणि त्याला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Team Hou De Viral