फुलाला सुगंध मातीचा मधली ‘किर्ती’ आणि बिगबॉस मधील अक्षय केळकर हे नवरा बायको आहेत का?

फुलाला सुगंध मातीचा मधली ‘किर्ती’ आणि बिगबॉस मधील अक्षय केळकर हे नवरा बायको आहेत का?

कलर्स मराठी या वाहिनीवर बिग बॉसचे चौथे सत्र 2 ऑक्टोबर पासून सुरू झाले आहे. या शोमध्ये अनेक कलाकार देखील सहभागी झालेले आहेत. यामधील एक कलाकार म्हणजे अक्षय केळकर हा आहे. अक्षय केळकर हा देखील अतिशय लोकप्रिय असा अभिनेता आहे.

त्याने अनेक मालिका चित्रपटातही काम केले आहे. अक्षय केळकर याने बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये अतिशय चांगले काम केले आहे. अक्षय केळकर याचे समृद्धी केळकर हिच्याशी देखील चांगले नाते आहे. नेमक काय नाते आहे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत कीर्तीची भूमिका समृद्धी केळकर या अभिनेत्रीने साकारलेली आहे. समृद्धी केळकर ही अतिशय उत्कृष्ट अशी अभिनेत्री आहे. लोभस, सुंदर आणि वर्णन करावे तेवढे कमी असे तिचे रूप आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा सक्रीय असते. आपल्या चाहत्यांशी सोशल मीडिया वरून संवाद देखील साधत असते.

चाहते देखील तिला अनेक प्रश्न विचारत असतात. या प्रश्नांचे उत्तर देखील ती आवर्जून देत असते.समृद्धी केळकर ही मूळ ठाण्यातील रहिवासी आहे. तिचा जन्म ठाण्यात झालेला आहे. तिचे प्राथमिक शिक्षण हे ठाण्यातील सरस्वती सेकंडरी हायस्कूल येथे झाले आहे. त्याचबरोबर तिने आपली बीकॉम मधील पदवी ही वाझे केळकर कॉलेज येथून पूर्ण केले आहे.

अभिनयाची आवड असल्याने तिने सुरुवातीला मॉडेलिंग केले. त्यानंतर अनेक जाहिराती देखील केल्या. त्यानंतर ती कलर्स मराठी वर सगळ्यात आधी ‘लक्ष्मी सदैव मंगलंम’ या मालिकेत दिसली होती. तिची ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर 2017 मध्ये ‘ढोलकीच्या तालावर’ या शो मध्ये देखील ती दिसली होती.

या स्पर्धेमध्ये तिची टॉप फाइव्ह डांसर मध्ये निवड झाली होती. त्यानंतर ती सध्या आता ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिची कीर्ती ची भूमिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेत तिच्यासोबत हर्षद अतकरी, भुमिजा पाटील, पल्लवी पटवर्धन आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत.

समृद्धी केळकर ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतेच तिने काही फोटो आपले सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. या फोटोमध्ये ती अधिकच सुंदर आणि खुलून दिसत आहे. अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर होत असतात. या दोघांनी एका वेब सिरीज मध्ये देखील एकत्र काम केले होते.

मात्र, सोशल मीडियावर या दोघांचे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हे दोघे प्रियकर प्रेयसी आहेत का? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. कारण की यांचे फोटो खूपच जवळून चित्रित करण्यात आले आहे. एकमेकांना चिटकून हे दोघे फोटोमध्ये दिसत आहेत. त्यामुळे ते प्रियकर आणि प्रेयसी आहे का असा प्रश्न अनेकांना पडला.

त्यावर समृद्धी केळकर हिनेच खुलासा करून सांगितले आहे की, आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. मला अक्षय हा भावाप्रमाणेच आहे, असे तिने म्हटले आहे. मात्र, तिच्या या म्हणण्यावर देखील अनेकांनी मत व्यक्त केले आहे, तर आपल्याला अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर यांची जोडी कशी वाटते, आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral